क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Crime Branch : बांगलादेशी घुसखोर महिलेला सात महिन्यांची कोठडी! बनावट आधारकार्ड प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Mumbai Crime Branch Arrested Illegal Bangladeshi Women : मुलकी अधिकाऱ्यांची नजर चुकवून केली होती भारतात घुसखोरी; तोतयागिरी आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवले होते भारतीय पुरावे

मुंबई | मुंबईत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय आधारकार्ड बनवून तोतयागिरी करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला न्यायालयाने सात महिने कैद आणि 700 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रोहिमा मोनु शेख उर्फ रत्ना (32 वय ) असे या दोषी महिलेचे नाव आहे.

असा उघड झाला घुसखोरीचा बनाव 21 जून 2025 रोजी मुंबई गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाला एका महिलेबाबत खात्रीलायक माहिती मिळाली होती. डी.बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रोहिमा शेख हिला ताब्यात घेण्यात आले. तपासात असे निष्पन्न झाले की, तिने कोणत्याही वैध पारपत्राशिवाय (Passport) किंवा व्हिसाशिवाय भारतीय सीमेत घुसखोरी केली होती. इतकेच नव्हे तर, भारतात राहण्यासाठी तिने बनावट कागदपत्रांचा वापर करून स्वतःचे आधारकार्डही बनवून घेतले होते.

बांगलादेशाचे नागरिकत्व कार्ड तपासात हस्तगत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. तपासादरम्यान रोहिमा ही मूळची बांगलादेशातील जिल्हा नारियल, तालुका लोहगारा, गाव भाटियापारा येथील रहिवासी असल्याचे सिद्ध करणारे ‘बांगलादेश नागरिकत्व कार्ड’ पोलिसांनी हस्तगत केले. तिने भारतीय आधारकार्डचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी आणि भारतीय नागरिक असल्याचे भासवण्यासाठी केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.

न्यायालयाचा निकाल आणि कायदेशीर कलमे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे, पारपत्र नसताना घुसखोरी करणे, तोतयागिरी करणे आणि बोगस कागदपत्रे सादर करणे हे सर्व आरोप सिद्ध झाले. त्यानुसार न्यायालयाने तिला भारतीय न्याय संहिता आणि परकीय नागरिक कायद्याच्या विविध कलमान्वये शिक्षा सुनावली.

या पथकाने बजावली कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम आणि अपर आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-2 चे प्रभारी निरीक्षक दिलीप तेजनकर, प्रशांत गावडे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. बनावट आधारकार्ड बनवून देणाऱ्या रॅकेटचाही पोलीस आता शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0