Mumbai Drug News : ड्रग्ज तस्कराचा मुसक्या आवळल्या! सराईत गुन्हेगार नियाज खानला ‘PIT-NDPS’ अंतर्गत एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध

Mumbai Police Take Action Against Drug Peddler : जामिनावर सुटताच पुन्हा सुरू केला होता अंमली पदार्थांचा धंदा; मुंबई पोलिसांनी गृह विभागाच्या मंजुरीने धाडले नागपूर जेलमध्ये
मुंबई | मुंबईत अंमली पदार्थांची Mumbai Drug Selling तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एम.डी. (मेफेड्रॉन) सारख्या घातक अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नियाज शब्बीर खान (वय 39) या सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) ‘PIT-NDPS’ कायद्यांतर्गत वर्षभरासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. वारंवार गुन्हे करूनही जामिनावर सुटल्यावर पुन्हा तस्करीत सक्रिय होणाऱ्या गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी हे कडक पाऊल उचलले आहे. Mumbai Police Latest Crime News
गुन्हेगारीचा मोठा इतिहास; 9 गुन्हे दाखल मूळचा मुंबईतील जेकॉब सर्कल परिसरातील रहिवासी असलेला नियाज खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS) 4 आणि भारतीय दंड संहितेनुसार 5 असे एकूण 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात अंमली पदार्थांच्या तस्करीसह चोरी, फसवणूक आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चारपैकी तीन अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात तो जामिनावर मुक्त झाला होता, मात्र जामिनाचा गैरफायदा घेत त्याने पुन्हा तस्करी सुरू केली होती. Mumbai Breaking News
काय आहे ‘PIT-NDPS’ कारवाई?
अंमली पदार्थांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी ‘अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम 1988’ (PIT-NDPS ACT 1988) हा अत्यंत कडक कायदा वापरला जातो. नियाज खान हा जामिनावर सुटल्यावर पुन्हा समाजासाठी घातक ठरत असल्याचे पाहून, मुंबई पोलीस आयुक्तांच्या वतीने गृह विभागाला त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
गृह विभागाचा आदेश आणि नागपूरला रवानगी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने या प्रस्तावाचे गांभीर्य ओळखून नियाज खानला स्थानबद्ध करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार 22 जानेवारी 2026 रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन स्थानबद्धतेच्या आदेशाची बजावणी केली आणि थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
या पथकाची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त लखमी गौतम आणि अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे उप आयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर आणि वरळी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या सराईत तस्कराला गजाआड केले.



