मुंबईठाणे
Trending

मुंबईत ‘महिला राज’: भाजपच्या ‘या’ 7 नगरसेविका महापौरपदाच्या शर्यतीत; तेजस्वी घोसाळकर की राजश्री शिरवडकर? कोणाला मिळणार संधी?

Mumbai Women Mayor : आरक्षण ‘सर्वसाधारण महिला’ निघाल्याने भाजपला मोठा दिलासा; 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपमध्ये हालचालींना वेग

मुंबई l मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचे Mumbai BMC Mayor आरक्षण आज जाहीर झाले असून, अपेक्षेप्रमाणे मुंबईवर ‘महिला राज’ येणार आहे. ‘सर्वसाधारण महिला’ (General Woman) असे आरक्षण निघाल्याने भाजपमधील अनेक दिग्गज महिला नगरसेविकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेष म्हणजे, भाजपकडे अशा महिलांची संख्या मोठी आहे ज्यांना पालिका प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे.

महापौरपदासाठी चर्चेत असलेली प्रमुख नावे

1 राजश्री शिरवडकर: भाजपच्या निष्ठावंत आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळख. पक्षाने जर ज्येष्ठतेला प्राधान्य दिले, तर त्यांचे नाव सर्वात पुढे असेल.

2.तेजस्वी घोसाळकर: दहिसरच्या वॉर्ड क्रमांक २ मधून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

3.अलका केरकर: माजी उपमहापौर म्हणून त्यांना पालिका प्रशासनाचा अनुभव आहे. ज्येष्ठ नगरसेविका असल्याने त्यांचा दावा भक्कम मानला जातो.

4.हर्षिता नार्वेकर: कुलाबा परिसरातून निवडून आलेल्या हर्षिता नार्वेकर या सुशिक्षित आणि प्रगतशील चेहरा म्हणून ओळखल्या जातात. तरुण मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता मोठी आहे.

5.योगिता सुनील कोळी: मालाडमधून मोठ्या फरकाने विजय मिळवणाऱ्या योगिता कोळी यांचे नावही या शर्यतीत आहे.

6.रितू तावडे: घाटकोपर भागातून निवडून आलेल्या रितू तावडे याही अनुभवी नगरसेविका असून त्यांना प्रशासकीय कामकाजाची चांगली जाण आहे.

7.शितल गंभीर: भाजपच्या जुन्या आणि जाणत्या नगरसेविकांमध्ये त्यांचा समावेश होतो.

सत्तेचे समीकरण

बहुमताचा आकडा: 114

भाजप: 89

शिवसेना (शिंदे गट): 29 (एकूण महायुती: 118)

भाजपचाच महापौर का?

मुंबईत भाजपने 89 जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भाजप आणि शिंदे गटात सत्तेचा जो फॉर्म्युला ठरेल, त्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून महापौरपद भाजप आपल्याकडेच ठेवण्याची दाट शक्यता आहे. शिवाय, भाजपकडे 49 महिला नगरसेविका आहेत, तर ठाकरे गटाकडे 38. यामुळे संख्याबळाच्या जोरावर भाजप आपला महापौर सहज निवडून आणू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0