
Mumbra Corporater Shan Shaikh Statement : आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात ‘पतंग’ उडाली; उमेदवारी नाकारल्याचा बदला विजयाने घेतला; सहर शेख यांच्या विधानाने महाराष्ट्राचे राजकारण तापले
मुंब्रा/ठाणे l नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात ठाणे आणि मुंब्रा परिसरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंब्र्यात एमआयएमच्या तरुण उमेदवार सहर शेख यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. मात्र, विजयानंतर त्यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “आमच्या पक्षाच्या पतंगचा रंग हिरवा आहे आणि मला येत्या पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकायचा आहे,” असे खळबळजनक विधान सहर शेख यांनी केले आहे. Maharashtra Political Latest News
उमेदवारी नाकारल्याचा ‘अल्लाह’चा संदेश म्हणून घेतला बदला सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे सुरुवातीपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय होते. सहर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणे अपेक्षित होते, परंतु जितेंद्र आव्हाड यांनी शब्द फिरवून त्यांना डावलल्याचा आरोप सहर यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, “शेवटच्या क्षणी माझ्याकडे अजित पवार गट आणि एमआयएम अशा दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म होते. पण अजित पवार गट भाजपासोबत असल्याने, मी ‘अल्लाहचा संदेश’ समजून एमआयएमची साथ दिली आणि आज जनतेने आव्हाडांच्या घमेंडीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.” Mumbra Breaking News
मुंब्र्यात एमआयएमची मोठी मुसंडी प्रभाग क्रमांक 30 मध्ये एमआयएमचे संपूर्ण पॅनल (नफिस अन्सारी, सहर शेख, सुल्ताना शेख आणि शोएब डोंगरे) निवडून आले आहे. “जर आम्ही आव्हाडांना आव्हान दिले नसते, तर ते चुकीचे ठरले असते,” असे म्हणत सहर शेख यांनी आगामी काळात मुंब्र्यातून राष्ट्रवादीचे वर्चस्व संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यांच्या ‘हिरवा मुंब्रा’ करण्याच्या विधानावरून आता सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, भगवा विरुद्ध हिरवा असा नवा वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


