मुंबईठाणे
Trending

Nitin Nabin : भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांचा ‘ॲक्शन मोड’; पहिल्याच निर्णयात महाराष्ट्रातील ‘या’ दोन दिग्गज नेत्यांवर मोठी जबाबदारी!

Maharashtra BJP Latest News : विनोद तावडेंकडे केरळची धुरा, तर आशिष शेलारांवर तेलंगणाची जबाबदारी; राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच नबीन यांनी कंबर कसली

नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर नितीन नबीन Nitin Nabin यांनी तातडीने संघटनात्मक कामाला सुरुवात केली आहे. मंगळवारी औपचारिकपणे पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी पक्षाच्या आगामी रणनीतीनुसार अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये महाराष्ट्रातील दोन मातब्बर नेत्यांवर – राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे Vinod Tawade आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार Ashish Shelar – मोठ्या जबाबदाऱ्या सोपवून नबीन यांनी राज्यातील नेत्यांचा केंद्रातील वाढता दबदबा अधोरेखित केला आहे. Maharashtra BJP Latest News

नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या या पहिल्याच नियुक्त्यांमध्ये दक्षिण भारतावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, आगामी निवडणुकांसाठी अनुभवी नेत्यांची फळी मैदानात उतरवण्यात आली आहे.

नितीन नबीन यांचे पहिले 3 मोठे निर्णय

1.विनोद तावडेंवर दुहेरी विश्वास: नितीन नबीन यांनी सर्वात महत्त्वाची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर सोपवली आहे.

केरळ विधानसभा निवडणूक: केरळमध्ये भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे या सहप्रभारी म्हणून काम पाहतील.

चंदीगड महापौर निवडणूक

चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2.आशिष शेलारांकडे तेलंगणाची जबाबदारी: मुंबईतील आक्रमक नेते आशिष शेलार यांना राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. तेलंगणा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शेलार यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण भारतात पाय रोवण्यासाठी शेलार यांची रणनीती महत्त्वाची ठरणार आहे.

3.बंगळुरू महापौर निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय समिती: कर्नाटकातील बंगळुरू महापौर निवडणुकीची जबाबदारी नबीन यांनी राम माधव, सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय या नेत्यांच्या समितीकडे सोपवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0