ठाणेमुंबई
Trending

Kalyan Political News : कल्याणमध्ये मोठा ‘पॉवर गेम’! ठाकरेंच्या दोन नगरसेवकांवर कारवाईचा बडगा; शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले थेट ‘मातोश्री’च्या शिलेदाराकडे

Madhur Mahtre And Kirti Thone : मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे ‘नॉट रिचेबल’; 62 चा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण शिगेला

कल्याण l कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल KDMC Election जाहीर झाल्यानंतर आता सत्तेची गणिते जुळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. 62 या बहुमताच्या आकड्यासाठी फोडाफोडीचे संकेत मिळत असतानाच, शिवसेना (UBT) ठाकरे गटाचे दोन नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी कडक भूमिका घेत, पुढील काही तासांत मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे या दोन्ही नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.

दोन जिल्हाप्रमुखांच्या भेटीने चर्चांना उधाण आज दुपारी एक विलक्षण राजकीय दृश्य कल्याणमध्ये पाहायला मिळाले. शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी थेट ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट केवळ ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी आणि कौटुंबिक स्वरूपाची असल्याचे स्पष्टीकरण दोन्ही बाजूंनी देण्यात आले असले, तरी सत्तास्थापनेच्या काळात या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन्ही नगरसेवक ठाकरे यांच्याच संपर्कात असल्याची माहिती महेश गायकवाड यांनी यावेळी दिली, मात्र शरद पाटील यांनी हे नगरसेवक पक्षाच्या संपर्कात नसल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोकण भवनाकडे रवाना झाले आहेत.

सत्तास्थापनेचे सध्याचे बलाबल: कल्याण-डोंबिवलीत सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 62 इतका आहे. सध्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

शिवसेना (शिंदे गट): 53

भाजप: 50

शिवसेना (ठाकरे गट): 11

मनसे: 5

शिंदे गट आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये कोणाचा महापौर होणार, यावरून स्पर्धा सुरू असतानाच, ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. ठाकरे गटाचे 9 नगरसेवक आधीच अज्ञात स्थळी गेले असून, त्यात आता दोन नगरसेवकांच्या बंडखोरीची चर्चा सुरू झाल्याने कल्याणचे राजकारण चांगलेच तापले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0