क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Online Ticket Fraud : ऑनलाईन विमान तिकीट बुकिंगमधील फसवणूक; सायबर पोलिसांनी मिळवून दिले पैसे परत!

Mira Bhayandar Cyber Police Latest News : नयानगरमधील तक्रारदाराला १६,९०८ रुपयांचा परतावा; मीरा-भाईंदर सायबर पोलिसांची मोठी कामगिरी.

मिरा-भाईंदर l ऑनलाईन विमान तिकीट बुकिंगच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीप्रकरणी मीरा-भाईंदर, वसई-विरार सायबर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तक्रारदाराची पूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. फसवणूक झालेली 16,908 रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या मूळ खात्यात जमा करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांना प्रतीकात्मक धनादेश देऊन ही आनंदाची बातमी दिली.Mira Bhayandar Police Latest News

नेमकी घटना काय?

नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे तक्रारदार साहू यांना कामानिमित्त मॉरिशस येथे जायचे होते. यासाठी त्यांनी ‘मुंबई ते मॉरिशस’ असे विमान तिकीट बुक करण्यासाठी एका अनोळखी ऑनलाईन एअर तिकीट बुकिंग वेबसाईटचा आधार घेतला. तिकीट बुक केल्यानंतर त्यांना तिकीट प्राप्त झाले, मात्र त्यावर विमानाचा पीएनआर (PNR) क्रमांक नमूद नव्हता. संशय आल्याने त्यांनी वेबसाईटवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

सायबर पोलिसांची तातडीची कारवाई

तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ ‘NCCRP’ पोर्टलवर तक्रार नोंदवून तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान असे दिसून आले की, तक्रारदाराची रक्कम एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे वापरण्यात आली होती. सायबर पोलिसांनी वेळ न घालवता संबंधित ई-कॉमर्स कंपनीशी पत्रव्यवहार केला आणि झालेला व्यवहार रद्द करण्याची विनंती केली. पोलिसांच्या या जलद हालचालींमुळे तो व्यवहार रद्द झाला आणि फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या मूळ खात्यात परत मिळवण्यात यश आले.

यशाचे मानकरी

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ आणि सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, पोलीस निरीक्षक वैभव धनवडे यांच्यासह सायबर सेलच्या इतर कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0