ठाणेमुंबई
Trending

Harbour Train News : हार्बरच्या प्रवाशांना ‘प्रजासत्ताक’ गिफ्ट! 26 जानेवारीपासून धावणार

Harbour Train Update : एसी लोकल; उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांचा प्रवास होणार ‘गारेगार’

मुंबई | मुंबईची तिसरी जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या 26 जानेवारी 2026, म्हणजेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावर पहिली एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल या 60 किलोमीटरच्या पट्ट्यात आता प्रवाशांना वातानुकूलित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

असे असेल नव्या एसी लोकलचे वेळापत्रक

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार ते शनिवार या कालावधीत हार्बर मार्गावर एकूण 14 एसी फेऱ्या धावणार आहेत. यामध्ये 7 फेऱ्या पनवेलच्या दिशेने (डाऊन), तर 7 फेऱ्या सीएसएमटीच्या दिशेने (अप) असतील. दिवसाची पहिली फेरी पहाटे 4.15 वाजता वाशीहून वडाळा रोडसाठी सुटेल, तर डाऊन मार्गावरील पहिली गाडी वडाळा रोडवरून 5.06 वाजता पनवेलसाठी रवाना होईल.
कार्यालयीन कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेता, सकाळी 9.09 वाजता पनवेलहून सुटणारी लोकल ‘पीक अवर’मध्ये धावेल. तसेच संध्याकाळी 5.30 वाजता वडाळा रोडवरून पनवेलसाठी सुटणारी लोकल संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना दिलासा देईल. पनवेलवरून सीएसएमटीसाठी शेवटची एसी लोकल संध्याकाळी 6.37 वाजता सुटेल, तर सीएसएमटीवरून पनवेलसाठी रात्री 8.00 वाजता शेवटची एसी फेरी धावणार आहे.

रविवारी मात्र साधी लोकल

प्रवाशांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, ही एसी सेवा केवळ सोमवार ते शनिवार या दिवसांसाठी मर्यादित आहे. रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या नियोजित वेळेत साध्या (Non-AC) लोकल धावतील. सध्याच्या साध्या लोकलच्या फेऱ्यांच्या जागीच या 14 एसी फेऱ्या चालवल्या जाणार आहेत, त्यामुळे एकूण फेऱ्यांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0