ठाणेमुंबई
Trending

Mumbai BMC Election : महापालिका निवडणुकांचा ‘क्लायमॅक्स’! आज प्रचाराची रणधुमाळी थांबणार; गुरुवारी 15 जानेवारीला ‘महा-मतदान’

Mumbai BMC Election Update : पुणे, मुंबई, नागपूरसह २९ शहरांत हायव्होल्टेज प्रचार; ,5.30 वाजता राजकीय तोफा थंडावणार

मुंबई/पुणे | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून, सायंकाळी 5.30 वाजता जाहीर सभा आणि लाऊडस्पीकरचा आवाज बंद होईल. त्यानंतर सुरू होईल तो ‘गुतगुती’चा आणि भेटीगाठींचा काळ. मुंबईच्या 227, पुण्याच्या 163 आणि नागपूरच्या 156 जागांसह राज्यातील एकूण 2,869 जागांसाठी गुरुवारी, 15 जानेवारी 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेत्यांची फळी मैदानात

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात जाहीर सभा घेऊन ताकद अजमावणार आहेत. दुसरीकडे, अजित पवार यांचा शहरात भव्य रोड शो होणार असून, राज ठाकरे यांच्या पुणे मुक्कामामुळे मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

नागपूर: मुख्यमंत्री फडणवीस स्वतः दुचाकीवरून रोड शो करत आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

मुंबई: ‘ठाकरे युती’ (UBT + मनसे) आणि ‘महायुती’ (भाजप + शिंदे + अजित पवार) यांच्यात मुंबईत काटाजोड लढत असून, आज शेवटच्या दिवशी सोशल मीडिया आणि पदयात्रांवर भर दिला जात आहे.

निवडणूक प्रशासनाची जय्यत तयारी

1.सार्वजनिक सुट्टी: मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 15 जानेवारी रोजी मुंबई, पुणे आणि इतर निवडणूक क्षेत्रांत राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

2.पोलीस बंदोबस्त: पुण्यात 12 हजार, तर मुंबईत 50 हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील केंद्रांवर राज्य राखीव दलाची (SRPF) मदत घेतली जात आहे.

3.मतदान वेळ: सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0