क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Road Police : सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! ट्रेडिंग ॲपद्वारे फसवणूक झालेले साडेपाच लाख रुपये तक्रारदाराला मिळवून दिले परत

Mira Road Police Latest Crime News : सोशल मीडियावरील ‘ट्रेडिंग’ जाहिरातीला भुलून झाली होती फसवणूक; सायबर सेलने 4 महिने पाठपुरावा करून मिळवले यश

मिरा-रोड | शेअर मार्केटमध्ये Share Market Fraud मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ‘ऑनलाइन ट्रेडिंग अॅप’द्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांविरुद्ध मिरा-भाईंदर, वसई-विरार सायबर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे. काशिमिरा परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाची फसवणूक झालेली 5.54 लाख रुपयांची संपूर्ण रक्कम सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि कायदेशीर पाठपुराव्याद्वारे परत मिळवून दिली आहे. Mira Road Police Latest News

नेमके प्रकरण काय?

काशिमिरा पोलीस ठाण्याच्या Kashmira Police हद्दीत राहणारे तक्रारदार चौधरी यांनी टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन शेअर ट्रेडिंग संदर्भात एक जाहिरात पाहिली होती. कमी वेळात जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी संबंधित ट्रेडिंग ॲप डाऊनलोड केले आणि त्यात वेळोवेळी मोठी रक्कम गुंतवली. मात्र, जेव्हा त्यांनी नफा किंवा मुद्दल रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलीस तपासाचा चक्रव्यूह आणि यश
तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी NCCRP पोर्टलवर या प्रकरणाची तातडीने नोंद केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे ही रक्कम ज्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग झाली होती, त्यांचा शोध घेतला. तपासादरम्यान संशयास्पद 7 बँक खात्यांची माहिती मिळाली. पोलिसांनी या बँकांशी सातत्याने पत्रव्यवहार करून 4 महत्त्वाच्या खात्यांमधील व्यवहार गोठवले (Freeze).

बँक खात्यांमधील ही रक्कम

कायदेशीररीत्या परत मिळवण्यासाठी पोलिसांनी तक्रारदाराला न्यायालयात याचिका सादर करण्यास मदत केली. सायबर पोलिसांनी न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर, न्यायालयाने ही रक्कम तक्रारदाराला परत देण्याचे आदेश दिले. सायबर पोलिसांनी बँकांशी तब्बल 4 महिने सतत पाठपुरावा केला आणि अखेर 5.54 लाख रुपये तक्रारदाराच्या मूळ बँक खात्यात जमा झाले.

प्रतिकात्मक धनादेश देऊन सन्मान
तक्रारदाराची कष्टाची रक्कम परत मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून एका प्रतिकात्मक चेकच्या माध्यमातून माहिती दिली. आपली रक्कम सुरक्षित परत मिळाल्याने तक्रारदाराने सायबर पोलिसांचे आभार मानले आहेत.

ही यशस्वी कामगिरी

पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रकाश सावंत व त्यांच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाव्हळ, माणिकराव कतुरे व इतर कर्मचारी) पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0