सोलापूरसोलापूर
Trending

Solapur News : “अजित पवारांना मत म्हणजे वक्फ कायद्याला समर्थन!”; सोलापुरात ओवैसींचा ‘महायुती’वर प्रहार

Solapur Political Latest News : हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान होईल; बाबासाहेबांच्या संविधानाचा दाखला देत ओवैसींचे भाकीत

सोलापूर | “अजित पवार हे नरेंद्र मोदींच्या गोदीत बसले आहेत. त्यांना दिलेले एक एक मत म्हणजे मोदींना दिलेले मत आहे आणि त्यांनी आणलेल्या वक्फ कायद्याला दिलेले समर्थन आहे,” अशा बोचऱ्या शब्दांत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

संविधान आणि हिजाबचा मुद्दा

ओवैसी यांनी भारतीय संविधानाची थोरवी सांगताना पाकिस्तानशी तुलना केली. ते म्हणाले, “पाकिस्तानच्या घटनेत केवळ एकाच धर्माचा माणूस राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे कोणताही भारतीय पंतप्रधान बनू शकतो. मला पूर्ण विश्वास आहे की, एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान होईल. तो दिवस पाहण्यासाठी मी कदाचित जिवंत नसेन, पण तो दिवस नक्की येईल.”

अजित पवारांना थेट आव्हान

राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि एमआयएम यांच्यातील संघर्षावर भाष्य करताना ओवैसी कमालीचे आक्रमक झाले. “कोणीतरी माझ्या शेरवानीला हात लावण्याची भाषा करत आहे. तुमच्या राजकीय बापाला (अजित पवार) माझ्यासमोर बसवा, तीन मिनिटांत त्यांना मुका (गप्प) नाही केले तर सांगा,” अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले. मोदी, शिंदे आणि अजित पवार ही ‘त्रिमूर्ती’ एकच असून ते जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सोलापूरसाठी आश्वासनांची खैरात
‘नई जिंदगी’ परिसरातील मतदारांना साद घालताना ओवैसी यांनी अनेक नागरी सुविधांचे आश्वासन दिले:

पाणी आणि रस्ते: एमआयएमचे चार नगरसेवक निवडून आल्यास 16 इंच पाण्याची पाईपलाईन आणि शुगर फॅक्टरीच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन.

आरोग्य आणि मालमत्ता: चार नगरसेवकांमार्फत रुग्णवाहिका सुरू करणे आणि प्रलंबित ‘प्रॉपर्टी कार्ड’चा प्रश्न इम्तियाज जलील यांच्या माध्यमातून सोडवण्याचे आश्वासन.

शिक्षण: मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचे आवाहन करताना त्यांनी फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण केले.

इस्रायल निषेध आणि FIR वरून टीका

इस्रायलचा निषेध करणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केल्यावरून त्यांनी प्रशासनावर टीका केली. “FIR दाखल करणारा बहुतेक नेत्यानाहूचा पुतण्या असावा,” असा टोला त्यांनी लगावला. नई जिंदगी परिसराला बदनाम करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0