धाराशिव

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या त्यागाचे विस्मरण होऊ देऊ नये: मा.डॉ.शिरीष खेडगीकर

कळंब/धाराशिव (प्रतिनिधी) : दि.५ जानेवारी विद्यार्थी विकास मंडळ,डॉ. बा. आं. म. वि., छ.संभाजीनगर आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय (मराठी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती, त्या अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याची तिसरी लढाई:मराठवाडा मुक्तिसंग्राम या विषयावर पुष्प गुंफताना डॉ.शिरीष खेडगीकर (स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, छत्रपती संभाजी नगर ) म्हणाले, “स्वामी रामानंद तीर्थ हे एक व्रतस्थ संन्यासी, शिक्षक आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. त्यांनी तत्कालीन संस्थानात स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी नैतिक मूल्ये रुजवली आणि समाजसेवेची प्रेरणा दिली. भारताला स्वातंत्र्य मिळाले होते, परंतु काही तत्कालीन जुनागड, हैद्राबाद संस्थान अशी काही संस्थाने स्वातंत्र्यामध्ये विलीन झाली नव्हती. त्यांचा लढा मात्र कायम सुरूच होता. तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहता मराठवाड्याच्या नेतृत्वामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ यांनी लोकांना संघटित करून मराठवाडा मुक्तीसंग्राम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांची भूमिका महत्त्वाची होती, हे भारतीय संस्कृतीची जोपासना करण्याचे आवाहन केले.
दुसरे व्याख्याते श्री विवेक सौताडेकर (लातूर जिल्हा शासकीय इतिहास संशोधक मंडळ सदस्य) म्हणाले, ” प्रचंड संघर्षाच्या माध्यमातून हा असलेला मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला आणि बहुजनांच्या व्यक्तीस्वातंत्र्यात भर पडली. प्रत्येकाला सामाजिक न्यायाची जाणीव झाली. त्यांनी मराठवाडा विद्यार्थ्यांना मुक्तीसंग्रामाचा इतिहास, मागच्या पिढ्यांचा त्याग आणि समर्पण समजून घेणे गरजेचे असल्याचे मत मांडले. उस्मानाबाद जिल्हा अग्रेसर होता, कारण तत्कालीन मराठवाड्याच्या मुक्ती लढ्यात उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लातूरचाही समाविष्ट असल्यामुळे तो क्षेत्रफळाने मोठा असलेला भूभाग होता. यामध्ये या निजामाच्या अन्यायी आणि अत्याचाराच्या लढ्यात युवकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक डॉ.डी.एस.जाधव, उपप्राचार्य डॉ.के.डी.जाधव,प्रा.जयंत भोसले तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांची उपस्थिती होती.
सदर व्याख्यानमालेची सुरुवात संस्थेचे संस्थापक पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
पाहुण्यांचे स्वागत बुके, शाल आणि आदर्श मराठी व्याकरण आणि लेखन हे पुस्तक देऊन करण्यात आले.
डॉ. ईश्वर राठोड, प्रा. शाहरुख शेख, प्रा. बालाजी वाघमारे डॉ.जयवंत ढोले, प्रा. राम दळवी, डॉ. एन. एम. अदाटे, डॉ.मीनाक्षी जाधव प्रा. ए.आर.
मुखेडकर, प्रा. दीपक वाळके, डॉ.विश्वजित मस्के, प्रा.सुषमा घाटपारडे,प्रा.लोहकरे, प्रा.वाघमारे उपस्थित होते.
प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.दादाराव गुंडरे, सूत्रसंचालन व्याख्यानमाला समन्वयक प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी तर आभारप्रदर्शनात डॉ.एन.एम.साठे यांनी विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांचेही तसेच उपस्थितांचेही आभार मानले. यावेळी बहुसंख्यने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक श्री हनुमंत जाधव, संतोष मोरे यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0