Bhiwandi Police News : भिवंडीत 55 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हे शाखेची आसबीबी मशिदीसमोर धडक कारवाई, 3 आरोपी अटकेत

Bhiwandi Police Busted Gutkha Racket : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘गुन्हेगार वॉच’ दरम्यान मोठे यश; 78 लाखांचा एकूण मुद्देमाल हस्तगत
भिवंडी | भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली आहे. गुन्हे शाखा घटक-2 च्या पथकाने आसबीबी मशिदीसमोर सापळा रचून तीन टेम्पोमधून केली जाणारी मोठ्या प्रमाणावरील गुटख्याची अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी कोट्यवधींच्या आरोग्याशी खेळणारा 54 लाख 99 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. Bhiwandi Police News
पोलिसांनी रचला सापळा
गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई विजय कुंभार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन टेम्पो भादवड नाक्याकडून कल्याण नाक्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा घेऊन येणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने आसबीबी मशिदीसमोर नाकाबंदी करून सापळा रचला. Bhiwandi Crime News
तीन टेम्पो आणि तीन आरोपी ताब्यात
तपासणी दरम्यान पोलिसांनी संशयास्पद वाटणारे तीन टेम्पो थांबवून त्यांची झडती घेतली. यामध्ये खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
1.गणेश संजय मस्कर (टाटा इन्ट्रा टेम्पो – MH 04 LE 3910)
2.अक्षय सदाशिव गुडेकर (महिंद्रा विरो टेम्पो – MH 04 MR 3391)
3.अजिम वहीद शेख (आयशर टेम्पो – DD 01 F 9102)
मुद्देमाल आणि कायदेशीर कारवाई
झडतीमध्ये पोलिसांना 54 लाख 99 हजार रुपयांचा गुटखा सापडला. गुटख्यासह 23 लाख रुपये किमतीचे तीन टेम्पो असा एकूण 77 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पथक
ही यशस्वी कामगिरी पोलीस उप-आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे.


