क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kalyan Crime Branch : इराणी टोळीच्या दोन सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे शाखेकडून बेड्या; 30 लाखांचे सोने हस्तगत

Kalyan Latest Crime Branch News : दोन राज्यांतील ५२ गुन्हे उघडकीस; ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह कर्नाटक राज्यात होता ‘चैन स्नॅचर्स’चा हैदोस

कल्याण | ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि थेट शेजारील कर्नाटक राज्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या अट्टल इराणी टोळीला कल्याण गुन्हे शाखेच्या घटक-3 ने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 52 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून 30 लाख 6 हजार 750 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अशी झाली कारवाई?

ठाणे शहर आयुक्तालयात वाढत्या चैन स्नॅचिंगच्या Chain Snacher घटनांचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा करीत होती. तपासादरम्यान पोलीस अंमलदार प्रशांत वानखेडे व विनोद चन्ने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आंबिवलीतील इराणी वस्तीत राहणारे कासिम गरिबशहा इराणी (38 वय) आणि मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी (32 वय) हे या गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही आंबिवली परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला कोळशेवाडी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली होती, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्यांचा पाढाच वाचला.

आंबिवलीच्या इराणी वस्तीतून आरोपी जेरबंद; कासिम आणि मुख्तार इराणीचा गुन्हेगारी आलेख थक्क करणारा

तपासात 52 गुन्ह्यांची कबुली आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत हैदोस घातल्याचे मान्य केले. तपासात कोळशेवाडी, टिळकनगर, कळवा, खडकपाडा, बदलापूर, अंबरनाथ, मुंबईतील साकीनाका, धारावी, नवी मुंबईतील पनवेल, खारघर, कामोठे यासह कर्नाटक राज्यातील आदर्शनगर आणि बदामी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 52 गुन्हे उघडकीस आले आहेत.

सराईत गुन्हेगारांचा इतिहास अटकेत असलेला कासिम इराणी हा आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नाशिक, पुणे, अहमदनगर आणि अकोला येथे 20 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर मुख्तार इराणी याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत 14 गुन्हे नोंदवलेले आहेत. हे आरोपी चोरी करताना पोलिसांची बतावणी करून किंवा ज्येष्ठ नागरिकांना गाठून त्यांना फसवून दागिने लंपास करण्यात पटाईत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0