Solapur News : सोलापूर निवडणुकीत रक्ताचा सडा! भाजपच्या दोन गटांतील राड्यात मनसे नेत्याची हत्या; माजी नगरसेवकाचे कार्यालयही फोडले

Solapur MNS Latest News : बंडखोरी मागे घेण्यावरून जुंपली; मध्यस्थीसाठी गेलेल्या बाळासाहेब सरवदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू; शहरात पोलीस छावणीचे स्वरूप
सोलापूर | महानगरपालिका निवडणुकीच्या Solapur BMC News अर्ज माघारीच्या दिवशी सोलापुरात ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा सुरू असतानाच एका हत्येच्या घटनेने शहर हादरून गेले आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील बंडखोरीच्या वादातून भाजपच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर सोलापूरच्या जोशी गल्ली परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. SOLAPUR latest news
नेमका वाद काय?
सोलापूर महापालिकेच्या प्रभाग-2 मध्ये भाजपने शालन शिंदे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात भाजपच्याच रेखा सरवदे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी आपला अर्ज मागे घ्यावा, यासाठी भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे आणि सरवदे गट यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आज माघारीच्या शेवटच्या दिवशी या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले.
कार्यालय फोडले आणि जीवघेणा हल्ला
उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून सुरू असलेल्या वादात संतप्त गटाने शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय फोडून टाकले. यावेळी दोन्ही गटाचे समर्थक आमनेसामने आले. याच वेळी भांडण सोडवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी गेलेले मनसेचे बाळासाहेब सरवदे यांच्यावर शिंदे गटाच्या लोकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गंभीर जखमी अवस्थेत सरवदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मनसेचा भाजप नेत्यांवर गंभीर आरोप
या हत्येप्रकरणी मनसेचे लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत इंगळे यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “प्रभाग-2 मधून भाजप आमदाराचे पुत्र रिंगणात असून हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी सरवदे कुटुंबावर मोठा दबाव आणला जात होता. सामाजिक सलोखा राखण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या आमच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली,” असा खळबळजनक दावा इंगळे यांनी केला आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
हतेच्या घटनेनंतर सोलापूर महापालिका परिसर आणि जोशी गल्लीत संतापाची लाट आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा फौजफाटा तैनात केला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसे आणि सरवदे समर्थकांनी केली आहे.



