पुणे
Trending

Ajit Pawar : पिंपरीत अजित पवारांचा ‘रौद्रावतार’! भाजपच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढत ‘दादां’नी उडवली स्थानिक नेत्यांची झोप

Ajit Pawar On BJP Member Pune : मुरलीधर मोहोळांनाही घेरले; निलेश घायवळ प्रकरणावरून पवारांचे ‘सूचक’ संकेत; भाजपचे स्थानिक आमदार ‘बॅकफूट’वर!

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका PCMC Election निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचा ‘धर्म’ बाजूला सारून भाजपवर भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आणि प्रचार सभेत अजित पवारांनी आक्रमक पवित्रा घेत आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेला भाजपने कर्जबाजारी केल्याचा घणाघात केला. 2017 मध्ये मोदी लाट आणि विठ्ठलाच्या मूर्ती खरेदीतील भ्रष्टाचाराच्या अफवेमुळे आमची सत्ता गेली, पण सत्तेत आलेल्या भाजपने प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करून महापालिका पोखरून काढली, असा आरोप त्यांनी केला. Maharashtra Latest Political News

भ्रष्टाचाराच्या आरोपांचा ‘स्टेनगन’ मारा

अजित पवारांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचाराचे वाभाडे काढताना रस्तेखोदाई, कचरा व्यवस्थापन, रस्तेबांधणी, पदपथ आणि चक्क कुत्र्यांच्या नसबंदीमध्येही ‘टेंडर रिंग’ करून लुटालूट झाल्याचे सांगितले. शहरातील नेत्यांनी रस्ते वाटून घेतले असून तिथे हफ्तेखोरी आणि दहशतीचे राजकारण सुरू आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. याशिवाय, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांना लाच घेताना झालेल्या अटकेचा दाखला देत त्यांनी भाजपच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला.

यावेळी केवळ स्थानिक नेतेच नव्हे, तर पुण्याचे भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनाही अजित पवारांनी लक्ष्य केले. कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या परदेशातील पलायन प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी विचारले की, त्याला पासपोर्ट कोणी दिला आणि त्याला पळून जायला कोणी मदत केली? गेल्या काही वर्षांत भाजपने कोणाकोणाला उमेदवारी दिली याचीही माहिती जनतेने घ्यावी, अशी सूचक टिप्पणी त्यांनी केली.

अजित पवारांच्या या रौद्रावतारामुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे स्थानिक आमदार आणि नेते पूर्णपणे बचावात्मक भूमिकेत गेल्याचे दिसून येत आहे. आमदार महेश लांडगे यांनी या विषयावर संपर्क टाळला, तर आमदार शंकर जगताप यांनी प्रचारात व्यस्त असल्याचे निरोप धाडले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मात्र सावध भूमिका घेत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच या सर्व आरोपांना अधिकृत उत्तर देतील, असे स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने आणि अजित पवारांनी भाजपवर थेट हल्ला चढवल्याने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0