मुंबईठाणे
Trending

Mumbai Mahayuti News : मुंबईत महायुतीचा ‘137-90’ फॉर्म्युला फिक्स! मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘नंदनवन’वर मध्यरात्री एबी फॉर्मचे वाटप; अमेय घोले ठरले पहिले उमेदवार

Mumbai Mahayuti Latest News : बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेची ‘गुपित’ रणनीती; चांदिवलीत दिलीप लांडेंच्या शिलेदारांना संधी, तर यामिनी जाधव पुन्हा रिंगणात

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी Mumbai BMC Election अर्ज भरण्याचा अवघा एक दिवस उरला असताना, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तब्बल 6 तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर भाजपने 137, तर शिवसेनेने (शिंदे गट) 90 जागांवर लढण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी रात्री उशिरा आपल्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी उमेदवारांना बोलावून थेट एबी फॉर्म (AB Form) सुपूर्द केले.

वडाळ्यातून अमेय घोले ‘फर्स्ट चॉईस’

एबी फॉर्म वाटपाच्या प्रक्रियेत वडाळ्याचे माजी नगरसेवक अमेय घोले यांना पहिला फॉर्म देण्यात आला. घोले यांनी युवा सेनेतून शिंदे गटात प्रवेश केला होता, त्यांच्या निष्ठेचे फळ त्यांना या उमेदवारीच्या रूपाने मिळाले आहे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत नंदनवनवर इच्छुक उमेदवारांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली.

चांदिवलीत आमदार दिलीप लांडेंची ताकद

चांदिवली विधानसभा क्षेत्रात आमदार दिलीप लांडे यांनी आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 6 उमेदवारांना संधी दिली आहे:

वॉर्ड १६६: मीनल तुरडे

वॉर्ड १५६: अश्विनी माटेकर

वॉर्ड १६०: किरण लांडगे

वॉर्ड १६२: वाजिद कुरेशी

वॉर्ड १६३: शैला लांडे

वॉर्ड १६१: विजय शिंदे

यावेळी बोलताना आमदार लांडे यांनी “मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल आणि तो सनातन धर्माचा झेंडा घेऊन बसेल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

यामिनी जाधव आणि राजुळ पटेल पुन्हा मैदानात

शिवसेनेने मुंबईतील आपल्या दिग्गज चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. यामध्ये वॉर्ड २०९ मधून यामिनी जाधव, जोगेश्वरीतून राजुळ पटेल आणि भटवाडी-घाटकोपरमधून अश्विनी हांडे यांचा समावेश आहे. तसेच डॉ. अदिती खूरसंगे (वॉर्ड ११) आणि परमेश्वर कदम (वॉर्ड १३३) यांनाही संधी देऊन पक्षाने सर्वसमावेशक चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे.

गुपित’ यादीमागील कारण
मुंबईत महायुतीतील दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. अधिकृत यादी जाहीर केल्यास बंडखोरी होऊन मतांचे विभाजन होण्याची भीती असल्याने, एकनाथ शिंदे यांनी थेट उमेदवारांच्या हाती फॉर्म सोपवून त्यांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. यामुळे विरोधकांना रणनीती आखण्यास वेळ मिळू नये, हाही यामागचा एक उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0