
Mumbai Thane BMC Election Latest News : विनायक राऊतांचे निकटवर्तीय राजू नाईकही मैदानात; ठाण्यात उमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘धनुष्यबाण’ हाती
मुंबई/ठाणे | आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची लगबग सुरू असतानाच, मुंबईत शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कलिना येथील वॉर्ड क्रमांक 89 चे विद्यमान नगरसेवक दिनेश कुबल आणि खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय राजू नाईक यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
राष्ट्रवादीलाही धक्का; कार्यकर्त्यांची मोठी गळती
केवळ ठाकरे गटच नव्हे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील रवींद्र घुसळकर, राजू शेट्टी, विशाल कनावजे यांसारख्या प्रमुख कार्यकर्त्यांनीही उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ‘धनुष्यबाण’ हातात घेतला आहे. मुंबईतील महत्त्वाच्या वॉर्डांमध्ये प्रभाव असलेले हे नेते सत्ताधारी गटात गेल्याने विरोधकांच्या चिंतेत भर पडली आहे.
ठाकरे-मनसे युती आणि जागावाटपाचा तिढा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आगामी निवडणुकीसाठी युती झाली असली, तरी जागावाटपावरून कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे.
दादर-माहीमचा पेच: दादर-माहीम हा विभाग शिवसेना भवन आणि राज ठाकरेंचे निवासस्थान ‘शिवतीर्थ’ यामुळे प्रतिष्ठेचा मानला जातो. येथे ठाकरे गटाला 4 जागा मिळाल्या असून मनसेला 2 जागा (वॉर्ड 190 आणि 192) देण्यात आल्या आहेत.
बंडखोरीची भीती: मनसेसाठी सोडलेल्या जागांवर ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी दावा सांगितला आहे. ज्या वॉर्डांमध्ये ठाकरे गटाची ताकद जास्त आहे, तिथे मनसेला जागा सोडल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्र्यांचा ‘मास्टरस्ट्रोक’
एककीडे दोन्ही ठाकरे बंधू मराठी मतांच्या ध्रुवीकरणासाठी एकत्र आले असताना, एकनाथ शिंदे यांनी थेट विद्यमान नगरसेवक आणि विनायक राऊतांच्या निकटवर्तीयांना फोडून मुंबईत आपली पकड अधिक मजबूत केली आहे. दिनेश कुबल यांच्या रूपाने कलिनासारख्या महत्त्वाच्या भागात शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे.


