मुंबईठाणेपुणे
Trending

Mumbai-Pune News : महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात; 15 जानेवारीला मतदान तर 16 ला निकाल

Mumbai Pune BMC Election Election Latest News : मुंबई-पुण्यासह 29 महापालिकांसाठी रणधुमाळी; जागावाटपाचा पेच कायम असतानाच राजकीय वातावरण तापले

मुंबई :- मुंबईसह राज्यातील मुदत संपलेल्या 27 आणि नव्याने स्थापन झालेल्या जालना व इचलकरंजी अशा एकूण 29 महानगरपालिकांसाठी उद्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. 10 जुलै 2025 ची मतदार यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे.

निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे

उमेदवारी अर्ज भरणे: 23 ते 31 डिसेंबर 2025 (ऑफलाईन पद्धतीने)

अर्जांची छाननी: 31 डिसेंबर 2025

अर्ज माघार घेणे: 1 जानेवारी 2026

चिन्ह वाटप व अंतिम यादी: 3 जानेवारी 2026

मतदान: 15 जानेवारी 2026

मतमोजणी व निकाल: 16 जानेवारी 2026

जागावाटपावरून महायुती आणि आघाडीत खडाजंगी
नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला असला, तरी महापालिकांच्या जागावाटपावरून अद्याप पेच कायम आहे.

मुंबई आणि ठाणे: मुंबईत भाजप आणि शिंदे गट एकत्रित लढणार असल्याचे संकेत असले, तरी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 6 महापालिका असल्याने तिथे जागावाटपावरून दोन्ही पक्षांत ‘खणाखणी’ सुरू आहे. नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाचा ‘स्ट्राईक रेट’ चांगला राहिल्याने त्यांनी अधिक जागांची मागणी केली आहे.

पुणे: पुण्यात भाजप विरुद्ध अजित पवार गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसला सोबत घेण्यासाठी अजित पवारांनी सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नगरपालिका निकालांचा प्रभाव

नुकत्याच झालेल्या 288 जागांच्या नगरपालिका निवडणुकीत महायुतीने 207 जागा जिंकून निर्भेळ यश मिळवले आहे. यात भाजप 117 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 53 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 37 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 44 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालांमुळे महायुतीचे पारडे जड असले, तरी शहरांमधील स्थानिक प्रश्न आणि नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0