ठाणेमुंबई
Trending

नगरपरिषद रणसंग्राम: महायुतीचा ‘क्लीन स्वीप’! भाजपने मोडले 2017 चे रेकॉर्ड; 3,325 नगरसेवकांसह राज्यात वर्चस्व

Maharashtra Political News : महायुतीचे 75 टक्के नगराध्यक्ष विजयी; काँग्रेस 28 जागांसह चौथ्या क्रमांकावर, तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा फटका

मुंबई | राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला असून, भारतीय जनता पक्ष 3,325 नगरसेवकांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालांनी 2017 मधील भाजपचे स्वतःचेच रेकॉर्ड मोडीत काढले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी विरोधकांचे कंबरडे मोडले आहे.

विभागवार निकालाचा आढावा (नगराध्यक्ष पदे)

महायुतीने विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाचे वर्चस्व मोडीत काढले आहे.

1.विदर्भ (एकूण 100): भाजपने 58 जागांसह बाजी मारली आहे. काँग्रेसला 23 जागा मिळाल्या, तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाला येथे खातेही उघडता आले नाही.

2.मराठवाडा (एकूण 52): भाजप 25, शिवसेना 8, तर राष्ट्रवादी 6 जागांवर विजयी झाली आहे.

3.पश्चिम महाराष्ट्र (एकूण 60): येथे चुरशीची लढत झाली असून भाजप 19, शिवसेना 14 आणि राष्ट्रवादी 14 अशा समसमान जागांवर आहेत.

3.उत्तर महाराष्ट्र (एकूण 49): भाजप 18 आणि शिंदे गट 11 जागांसह आघाडीवर आहेत.

4.कोकण (एकूण 27): शिवसेना 10 आणि भाजप 9 जागांसह या भागात प्रबळ ठरली आहे.

“आम्हाला विधानसभेसारखे जनसमर्थन मिळाले” – देवेंद्र फडणवीस

निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “2017मध्ये भाजपचे 1,602 नगरसेवक होते, आज ही संख्या 3,325 वर पोहोचली आहे. राज्यातील 48 टक्के नगरसेवक एकट्या भाजपचे निवडून आले आहेत. हे यश महायुतीच्या विकासकामांवर जनतेने टाकलेला विश्वास आहे. मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही अभिनंदन करतो.”

संपूर्ण महाराष्ट्रात कुणाचे किती नगराध्यक्ष?

भाजप – 129

शिवसेना – 51

राष्ट्रवादी – 35

काँग्रेस – 35

शिवसेना ठाकरे गट – 9

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 7

इतर – 22

राज्यात कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले?

भाजप – 3325

शिवसेना – 695

राष्ट्रवादी – 311

काँग्रेस – 131

शिवसेना ठाकरे गट – 378

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 153

इतर – 140

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0