मुंबईठाणे
Trending

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याचा थरार! इमारतीत शिरून तिघांवर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

Mira Bhayandar Latest News : तलाव रोड परिसरातील घटना; पोलीस आणि अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू

मीरा-भाईंदर | मीरा-भाईंदर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तलाव रोड परिसरातील एका निवासी इमारतीत आज सकाळी अचानक बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बिबट्याने इमारतीतील रहिवाशांवर हल्ला चढवला असून, यामध्ये आतापर्यंत तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. Mira Bhayandar Leopard News

मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला बिबट्या मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास हा बिबट्या नागरी वस्तीत दाखल झाला. इमारतीच्या आवारात आणि जिन्यांवर बिबट्या वावरत असताना काही रहिवाशांनी त्याचे चित्रीकरण केले आहे. बिबट्याच्या वावराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामध्ये बिबट्या अत्यंत आक्रमक स्थितीत दिसत आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर घटनेची माहिती मिळताच मीरा-भाईंदर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले असून, इमारतीला सर्व बाजूंनी वेढा घालण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0