क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Palghar Bribe Case : पालघरमध्ये लाचखोर ग्रामसेवक जाळ्यात! – ना हरकत दाखल्यासाठी 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

Palghar Navapur Grampanchayt Bribe Case : नवापूर ग्रामपंचायतीतील प्रकार; कृषी पर्यटन केंद्राच्या मालकाकडून पैशांची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई

पालघर :- पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक राजेश पंढरीनाथ संखे याला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. एका कृषी पर्यटन केंद्राला ना हरकत दाखला (NOC) देण्यासाठी संखे याने ही लाचेची मागणी केली होती. Palghar Latest Bribe News

नेमकी घटना काय?

नवापूर गावातील एका व्यक्तीने आपल्या कृषी पर्यटन केंद्रात तरंग तलाव, तीन खोल्या, उपहारगृह आणि न्याहारी गृह सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केला होता. मात्र, नियमानुसार दाखला देण्याऐवजी ग्रामसेवक राजेश संखे याने तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली.

एसीबीचा सापळा आणि अटक

लाचलुचपत विभागाने मंगळवारी या तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे आणि पोलीस निरीक्षक राकेश डांगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. संखे याने पंचासमक्ष तक्रारदाराकडून 20 हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

या कारवाईत पोलीस कर्मचारी विलास भोये, आकाश लोहारे आणि जितेंद्र गवळे यांचा समावेश होता. याप्रकरणी संखे विरुद्ध सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0