Navi Mumbai Crime News : पतीचा सूड! – बायकोसोबत ‘त्या’ गैरप्रकारातून जुईनगरमध्ये खून; नवी मुंबई गुन्हे शाखेकडून सानपाडा परिसरातून आरोपी राजू मंडलला बेड्या

Navi Mumbai Murder News : कचरा वेचणाऱ्या इसमाला दगडाने ठेचले; 20 दिवसांपूर्वीच्या अनोळखी मृतदेहाचा पर्दाफाश; ‘देशी दारू’च्या व्यसनातून घडला भयानक प्रकार
नवी मुंबई :- नवी मुंबईतील एका बेवारस खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा, कक्ष १ Navi Mumbai Crime Branch Unit 1 ला मोठे यश मिळाले आहे. पत्नीसोबत गैरप्रकार केल्याच्या संशयातून आणि त्यातून आलेल्या रागातून आरोपीने एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. Navi Mumbai Latest Crime News
खुनाची थरारक कहाणी
मागील महिन्याच्या 20 नोव्हेंबर रोजी जुईनगर रेल्वे स्टेशनजवळील एका नाल्यात एक अनोळखी तरुण जखमी अवस्थेत मृतावस्थेत आढळला होता. नेरूळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी, गुन्हे शाखेच्या पथकांनी हा प्रकार गंभीर असल्याचा संशय घेऊन तपास सुरू केला.
तपासात मृत व्यक्ती हा कचरा वेचण्याचे काम करणारा आणि दारू व व्हाईटनरच्या व्यसनात असलेला कादीर करम हुसेन शेख उर्फ लखा (वय 25) असल्याचे उघड झाले.तपास पथकाने जुईनगर परिसरातील भंगार वेचणाऱ्या आणि दारूच्या दुकानांमध्ये कसून चौकशी केली.
या चौकशीतून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली
मयत कादीरने आरोपी राजू जब्बर मंडल (वय 27, रा. जुईनगर) याच्या पत्नीसोबत गैरप्रकार केला होता. या गैरकृत्याच्या रागातून राजू मंडल हा कादीरला शोधत होता.
दगडाने ठेचून घेतला जीव
दिनांक 11 डिसेंबर रोजी पोलिसांनी आरोपी राजू जब्बर मंडल याला सानपाडा येथील जुईनगर पार्किंगजवळील झोपड्यातून ताब्यात घेतले. त्याने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला. पत्नीसोबत झालेल्या गैरप्रकारामुळे रागाच्या भरात त्याने कादीरला गाठले आणि दगडाने डोक्यावर गंभीर दुखापत करून त्याला जीवे ठार मारले.
आरोपी राजू मंडल याच्या कबुलीनंतर नेरूळ पोलीस ठाण्यात या अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याला खुनाच्या गुन्ह्यात (बी.एन.एस. कलम 103(1) प्रमाणे) रूपांतरित करण्यात आले आहे.


