मुंबईठाणे
Trending

Maharashtra Winter Session : ‘लाडकी बहीण’ योजनेवर विधानसभेत टोलेबाजी! – शंभुराज देसाई आणि जयंत पाटलांमध्ये ‘नंबर’वरून जोरदार जुगलबंदी

Maharashtra Winter Session Latest News : “योजना आणणारे 1 चे 2 नंबर झाले!” – जयंत पाटलांचा उपहास; “पदांची अदलाबदल होते,” देसाईंचे प्रत्युत्तर. KYC च्या अटींवरूनही विरोधकांचे प्रश्नचिन्ह

नागपूर :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची राज्यभर चलती असली तरी, आज (10 डिसेंबर) विधानमंडळात या योजनेवरील चर्चेदरम्यान मंत्री शंभुराज देसाई Shambhu Raj Desai आणि आमदार जयंत पाटील Jayant Patil यांच्यात जोरदार शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली. विशेषतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या राजकीय ‘नंबर’वरून दोघांमध्ये उपरोधिक टोलेबाजी झाली.

‘नंबर वन-टू’ चा वाद

चर्चेदरम्यान जयंत पाटील यांनी शंभुराज देसाई यांनी केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत म्हटले की, देसाई म्हणाले होते की, ‘लाडकी बहीण योजना आणणारा व्यक्ती आज 2 नंबरवर आला.’ यावर पाटील यांनी पलटवार करत, “1 नंबरचा माणूस इथे नाही म्हणून शंभुराज आता 1 आणि २ नंबरबाबत बोलत आहेत,” असे म्हटले. पाटील यांनी पुढे उपहासाने म्हटले, “राज्य सरकारला या ‘लाडक्या बहिण योजनेनं फायदा झाला’, मात्र ज्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली ते 1 चे 2 नंबर झाले.” Jayant Patil vs Shambhuraj Desai

यावर शंभुराज देसाईंनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “मी वेगळं काही बोललो नाही. मुख्यमंत्री म्हणाले होते, आम्ही आमच्या आमच्यात पद बदलत असतो, तेच मी बोललो.” तसेच, “एकनाथ शिंदे कायम 2 नंबरचं राहतील असे नाही. पदांची अदलाबदल होत असते,” असे सांगत त्यांनी पाटील यांना टोला लगावला.

KYC च्या अटींवरून सरकारला धारेवर

यावेळी जयंत पाटील यांनी योजनेत घातलेल्या नव्या अटींवरून सरकारला धारेवर धरले. “निवडणुकीत ही योजना जाहीर झाली तेव्हा अशा अटी सांगितल्या होत्या का? योजना जड जाऊ लागल्याने आता KYC आणि 13 कंडिशन योजनांमध्ये घातल्या आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
यावर महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, अनेक महिलांचे बँकेत खाते नसल्याने त्यांनी घरातील कर्त्या पुरुषाचे खाते दिले आहे. यासाठीच KYC आणले. ज्या पुरुषांच्या बँक खात्यांवर पैसे जमा झाले, ती खाती तपासली जातील आणि खरंच पुरुष फायदा घेत असेल, तर नक्कीच कारवाई होईल, असे आश्वासन आदिती तटकरे यांनी सभागृहात दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0