पुणेक्राईम न्यूज
Trending

Pune News : पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड! – शस्त्रक्रियेत वडिलांचा मृत्यू झाल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा संताप

Pune Sayhdri Hospital News : “दोन टाक्यांच्या साध्या ऑपरेशनमध्ये डॅमेज केले!” – शिंदे गटाचे अजय सपकाळ यांचा रुग्णालयावर ‘थर्डक्लास’चा गंभीर आरोप, कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन.

पुणे :- पुण्यातील हडपसर परिसरातील सह्याद्री रुग्णालयात (Sahyadri Hospital) शस्त्रक्रियेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी काल (मंगळवारी) रुग्णालयात मोठी तोडफोड केली आणि ठिय्या आंदोलन सुरू केले. मृत व्यक्ती हे सत्ताधारी शिंदे गटाचे पदाधिकारी अजय सपकाळ यांचे वडील होते.

तोडफोड आणि संताप

शिंदे गटाचे वैद्यकीय कक्षाचे शहरप्रमुख असलेल्या अजय सपकाळ यांच्या वडिलांवर रुग्णालयात अल्सरचे उपचार सुरू होते. बुधवारी शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागातील काचा, कचऱ्याचा स्टीलचा डबा आणि लोखंडी वस्तूंच्या साहाय्याने फोडून आपला संताप व्यक्त केला. तोडफोडीमुळे प्रवेशद्वाराजवळ काचांचा खच पडला होता. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलबाहेर न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू केले.

सपकाळ यांचा आक्रमक पवित्रा

या घटनेबाबत अजय सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रुग्णालयाच्या कारभारावर अतिशय गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, “मी शिंदे गटाचा शहर प्रमुख असून माझ्याबाबत ही गोष्ट असेल, तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल?” ते पुढे म्हणाले, “माझ्या वडिलांचं अल्सरचं ऑपरेशन हे फक्त दोन टाक्यांची साधी शस्त्रक्रिया होती. पण, सह्याद्री रुग्णालयाने हळूहळू माझ्या वडिलांना डॅमेज केले. हे हॉस्पिटल बकवास आहे, थर्डक्लास आहे.” या रुग्णालयावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, ही आपली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी आहे. कारवाई होईपर्यंत आम्ही रुग्णालयाबाहेरून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा सपकाळ यांनी घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0