क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांकडून 5 कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट! – 1815 किलो गांजा आणि 27 हजार कोडीन बॉटल्सची तळोजा येथे विल्हेवाट

Mumbai Drug Busted News सन 2025 मधील तिसरी मोठी कारवाई; आतापर्यंत 136 कोटी रुपयांचे ड्रग्स नष्ट करून ‘अंमली पदार्थ मुक्त समाज’ निर्मितीचे उद्दिष्ट

मुंबई :- अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई Mumbai Crime News यांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत, जप्त केलेला तब्बल 05 कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला आहे. बृहन्मुंबई पोलीस दलाने अंमली पदार्थ मुक्त समाज बनवण्याच्या दृष्टीने ही मोहीम तीव्र केली आहे. Mumbai Latest Drug News

नष्ट केलेला मुद्देमाल

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई अंतर्गत दाखल असलेल्या 05 गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल होता.1815 किलोग्रॅम गांजा 27,780 कोडीन मिश्रित बॉटल्स हा एकूण 05 कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ दिनांक 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या मान्यता प्राप्त मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, तळोजा, पनवेल, रायगड येथील बंदिस्त भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला आहे.

सन 2025 मधील मोठी कारवाई

बृहन्मुंबई पोलीस दलाने केलेली ही सन 2025 मधील तिसरी मोठी कारवाई आहे.यापूर्वी मे 2025 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये 692 किलोग्रॅम अंमली पदार्थ आणि 12,341कोडीन मिश्रित बॉटल्स (किंमत अंदाजे 130 कोटी 86 लाख रुपये) नष्ट करण्यात आल्या होत्या.या तीनही कारवाईमध्ये मिळून आतापर्यंत एकूण 2,507 किलोग्रॅम अंमली पदार्थ आणि 40,221 कोडीन मिश्रित बॉटल्स (किंमत अंदाजे 136 कोटी रुपये) नष्ट करण्यात आल्या आहेत.

यशस्वी कार्यवाही

पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्या सहकार्याने ही यशस्वी कार्यवाही करण्यात आली. उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल कमिटीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, तसेच पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिडेकर आणि न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कलीना येथील अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही नाश प्रक्रिया पार पाडण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0