Vasai Virar Robbery News : वसई-विरारमध्ये मोटारसायकल चोराला बेड्या! – माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी, 8 दुचाकी हस्तगत
Vasai Virar Car Robbery News : 600 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी; पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून आरोपी अटक; 5.30 लाख रुपये किंमतीच्या 07 स्प्लेंडर व 01 बुलेटची चोरी उघड
वसई :- वसई, नालासोपारा आणि विरार परिसरात स्प्लेंडर व बुलेट मोटारसायकल चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत आरोपीला माणिकपूर पोलिसांनी Manikpur Police Station अटक केली आहे. आरोपीकडून चोरी झालेल्या 07 स्प्लेंडर आणि 01 बुलेट मोटारसायकलसह एकूण 8 मोटारसायकल हस्तगत करण्यात यश आले असून, 5 लाख 30 हजार रुपये किंमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.या कारवाईमुळे वसई-विरार परिसरात नोंद झालेले एकूण 07 गुन्हे उघडकीस आले आहेत. Vasai Virar Crime News
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्प्लेंडर मोटारसायकल चोरीच्या घटनेनंतर वरिष्ठांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास केला.
गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळावरून मिळालेल्या फुटेजच्या आधारे तसेच मुरबाड (ठाणे) आणि दादर (मुंबई) पर्यंत सुमारे 600 हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तांत्रिक कौशल्ये वापरून त्यांनी आरोपीला अविराज सुनील गायकवाड (वय 31, रा. उंब्रज, जुन्नर, जि. पुणे) याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली.
उघड झालेले गुन्हे
अटक आरोपी अविराज गायकवाड याच्याकडून माणिकपूर पोलीस ठाणे, नालासोपारा पोलीस ठाणे, विरार पोलीस ठाणे आणि बोळींज पोलीस ठाणे या हद्दीतील एकूण 07 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत.
पोलिस उप आयुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहायक पोलिस आयुक्त नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.


