क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Vasai Virar Gun Smuggling : वसई-विरारमध्ये ‘देसी कट्टा’ तस्करी उघड! – गुन्हे शाखेच्या ‘अटक’ मोहिमेत 50 हजारांचे पिस्टल, काडतुसे जप्त

Vasai Virar Gun Smuggling Latest News : नालासोपाऱ्यातील ‘चिमा पाटील’ संस्थेसमोर सापळा; अग्नीशस्त्र खरेदी-विक्री रॅकेटमधील दोन आरोपींना बेड्या; एका आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल

नालासोपारा/वसई :- वसई-विरार पट्ट्यात अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्याची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष-2 (वसई युनिट) ने जोरदार दणका दिला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 50 हजार 600 रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. Vasai Virar Latest Crime News

दिनांक 5 डिसेंबर रोजी गुन्हे शाखा कक्ष-2 चे अधिकारी नालासोपारा पूर्व परिसरात गस्त घालत असताना, त्यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली. या माहितीनुसार, नसरुद्दिन मोहम्मद शरीफ खान (वय 31) नावाचा आरोपी धानीवबाग तलाव जवळील चिमा पाटील शिक्षण संस्थेच्या मेनगेटसमोर शस्त्र घेऊन येणार होता.

पोलिसांनी तात्काळ सापळा रचून नसरुद्दिन खान याला ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ हे अवैध अग्नीशस्त्र आढळून आले. यानंतर, पोलिसांनी अधिक तपास करून अग्नीशस्त्र खरेदी-विक्रीच्या वितरणात सहभागी असलेल्या दुसऱ्या आरोपीला, क्रिष्णा रामचंद्र चव्हाण (वय 31, रा. वसई पूर्व) यालाही ताब्यात घेतले.
अटक आरोपी नसरुद्दिन खान याचा यापूर्वीचा गुन्हेगारी इतिहास मोठा असून, त्याच्यावर वालीव आणि पेल्हार पोलीस ठाण्यात दंगल, मारामारी, धमकी देणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात Pelhar Police Station आर्म्स ॲक्टच्या कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून, दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0