क्राईम न्यूजठाणेमुंबई

Vasai Drug News : वसईमध्ये 51 लाखांचे ‘मेफेड्रॉन’ जप्त! – नायजेरीयन अंमली पदार्थ तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; एमडी (MD) विक्रीच्या रॅकेटवर ‘क्रॅकडाऊन’

Vasai Latest Drug News : नालासोपाऱ्यातून आरोपीला अटक; पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष-2 ची धडक मोहीम यशस्वी

वसई/नालासोपारा :- मीरारोड-भाईंदर वसई-विरार पोलीस Vasai Virar Police आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा कक्ष-2 (वसई) ने कारवाई करत एका नायजेरीयन नागरिकाला 51 लाख 10 हजार रुपये किमतीच्या मेफेड्रॉन (M.D.) अंमली पदार्थासह अटक केली आहे. Vasai Virar Latest Drug News

पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या विशेष आदेशानुसार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असताना, गुन्हे शाखा कक्ष-2 वसईला गुप्त माहिती मिळाली. दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता नालासोपारा पूर्वेकडील शमा बेकरीसमोर, हायटेंशन रोड, प्रगतीनगर येथे पोलिसांनी सापळा रचला.

या कारवाईत उबा उर्फ नोसो उबा चिन्सले विस्डम (वय 30, मूळ नायजेरिया) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून तब्बल 255 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (M.D.) अंमली पदार्थ आणि मोबाईल फोन असा एकूण 51.10 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपीविरुद्ध तुळींज पोलीस ठाणे Tulij Police Station येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 (NDPS ॲक्ट) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0