पुण्यात ‘डबल’ कारवाई! – हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; युगांडाच्या महिलेसह स्पा मॅनेजरला अटक

Pune Sex Racket Busted Latest News : मुंढव्यात पर्यटक व्हिसावर आलेल्या परदेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय; हडपसरमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; चार पीडित महिलांची सुटका
पुणे :- पुणे शहरात पोलिसांनी Pune Police एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी कारवाई करत वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे शहरभरात खळबळ उडाली असून, युगांडाच्या एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एकूण चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. Pune Latest Crime News
मुंढवा येथील परदेशी रॅकेट उघड
मुंढवा येथील दळवी हाईट्समधील एका सदनिकेत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सराह फिओना नागोबी (मूळ युगांडा) या महिलेला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, युगांडा देशातील तीन परदेशी महिलांकडून येथे वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. या महिला भारतात पर्यटक व्हिसावर आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुंढवा पोलिसांनी आरोपी आणि पीडित महिलांचे पासपोर्ट पुढील तपासणीसाठी एफआरओ विभागाकडे पाठवले आहेत. Pune Mundhwa Sex Racket Latest News
हडपसरमध्ये स्पा सेंटरचा गैरवापर
दरम्यान, हडपसर पोलिसांनीही पुणे-सोलापूर रोडवरील रविदर्शन चौकातील अग्रवाल कॉर्नर येथील ‘युनिक स्पा’ सेंटरवर कारवाई केली. स्पाच्या नावाखाली येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. छाप्यात मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांची नावे सौरभ शामराव इंगळे आणि राहुल संजीव देवनाथ अशी आहेत. पोलिसांनी या ठिकाणाहून एका पीडित महिलेची सुटका केली असून, दोघांना अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
पुणे पोलिसांनी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील अवैध व्यवसायांवर केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी भीती पसरली आहे.



