महाराष्ट्र
Trending

Maharashtra Weather Report : राज्यात ‘तीन’ महिन्यांची तीव्र थंडी! – डिसेंबर ते फेब्रुवारी हिवाळी हंगामात कडाका वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Report Latest News : थंडीच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहणार; मराठवाडा, विदर्भात तापमान कमी होण्याची शक्यता

पुणे/मुंबई :- मोसमी पावसाचा लांबलेला प्रवास आणि त्यानंतर अवकाळी पावसाच्या माऱ्यानंतर आता नागरिकांना आगामी तीन महिने तीव्र थंडीचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामानशास्त्र खात्याने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, डिसेंबर ते फेब्रुवारी या आगामी हिवाळी हंगामात महाराष्ट्रासह मध्य भारतात थंडीचा कडाका जाणवणार आहे.

थंडीचा अंदाज (डिसेंबर ते फेब्रुवारी)

तापमान: महाराष्ट्रासह मध्य भारतात किमान आणि कमाल तापमान सरासरीइतके किंवा त्यापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

थंडीच्या लाटा: यंदाच्या हिवाळ्यात राज्यात थंडीच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे थंडीच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा तीन ते पाच दिवसांनी जास्त असू शकतात.

विदर्भ आणि मराठवाडा: या तीन महिन्यांत मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि कोकण: येथे किमान तापमान सरासरीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

डिसेंबर महिन्याचा विशेष अंदाज

उत्तर महाराष्ट्र: डिसेंबर महिन्यात उत्तर महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा: मराठवाड्यात थंडीच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

पाऊस: पूर्व किनारपट्टी, गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकणाचा उत्तर भाग आणि बिहार येथे डिसेंबरमध्ये पाऊस सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

उत्तरेकडील बदलाचा परिणाम

देशातील उत्तरेकडील पर्वतीय राज्यांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये किमान तापमानातील घटीमुळे तिथे थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील या तीव्र थंडीचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होत असून, राज्यातही किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0