क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai Crime News : ‘स्पा’च्या आड अनैतिक व्यापार! – नवी मुंबई गुन्हे शाखेची धडक कारवाई; 6 महिलांची सुटका, वाशीतील मॅनेजर गजाआड

Navi Mumbai Sex Racket ; 6000 रुपये घेऊन ‘बॉडी मसाज’चा गैरवापर; मुख्य आरोपी फरार, पोलिसांनी अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले

नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालय क्षेत्रात अनैतिक व्यापार आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) वाशीमध्ये मोठी कारवाई केली आहे. जुहूनगर, सेक्टर-11 येथील “आरपणाच सलुन आणि स्पा” या मसाज पार्लरच्या Sex Spa In Navi Mumbai नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. Navi Mumbai Sex Racket

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की, या स्पा पार्लरमध्ये 6,000 घेऊन महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. माहितीच्या आधारावर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर पथकाने लॉजवर छापा टाकून सहा महिलांची सुटका केली. Navi Mumbai Police Latest News

या प्रकरणी पोलिसांनी स्पाची महिला मॅनेजर असिमा रॉबिन घोष (वय 34, मूळ रा. कोलकत्ता) हिला अटक केली आहे. असिमा घोष आणि तिचा फरार असलेला पार्टनर नूर आलम शेख (रा. चेंबूर) यांनी संगनमत करून महिलांना मसाजच्या नावाखाली प्राप्त केले आणि बनावट ग्राहकांकडून मोबदला स्वीकारला, असे तपासात उघड झाले आहे. Navi Mumbai Breaking News

अटक करण्यात आलेल्या मॅनेजरला 4/12/25 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. वाशी पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी आणि फरार आरोपीवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0