क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Murder News : ‘अनैतिक संबंधा’च्या संशयातून चुलत भावाचा खून! – पुण्यात 4 लाखांची सुपारी देऊन हत्या, चौघांना अटक

Pune Latest Murder News :,खुनाच्या कटात स्वतः चुलत भाऊ सहभागी; आरोपी झारखंडला पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांकडून अटक

पुणे :- नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चुलत भावाचा खून करण्यासाठी सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. 17 नोव्हेंबर रोजी कात्रजमधील गुजरवाडी परिसरात घडलेल्या या खून प्रकरणी पुणे पोलिसांनी Pune Police खुनी चुलत भावासह एकूण चार जणांना अटक केली आहे. Pune Latest Crime News

कात्रजमधील साईनगर, खोपडेनगर परिसरात राहणाऱ्या अजयकुमार गणेश पंडीत (वय 22, मूळ रा. झारखंड) याचा तीक्ष्ण शस्त्राने खून करण्यात आला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास केला असता, अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडित (वय 35, रा. मोशी) यानेच या खुनाची सुपारी दिल्याचे उघड झाले. Pune Breaking News

खुनाची सुपारी आणि कारण

अशोक पंडितला त्याचा चुलत भाऊ अजयकुमारचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली होती. या संशयातूनच अशोकने अजयकुमारला संपवण्याचा कट रचला.

अशोक पंडितने अजयकुमारचा खून करण्यासाठी साथादीर कृष्णकुमार विजयमहतो वर्मा (वय 21), सचिनकुमार शंकर पासवान (वय 26) आणि खुनातील पहिला साक्षीदार रणजितकुमार धनुखी यादव (वय 30) यांना चार लाख रुपयांची सुपारी दिली होती.या खुनाच्या कटात अशोक पंडित स्वतःही सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे.

पुणे पोलिसांनी तांत्रिक तपास करून या चौघांचा शोध सुरू केला असता, ते रेल्वेने मूळ गावी झारखंडला पसार होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या चारही आरोपींना अटक केली. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0