सोलापूर
Trending

Solapur News : अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित! – सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; बिनविरोधाची औपचारिकता लांबणीवर

Solapur Latest News : न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊनही निवडणुकीला स्थगिती; राजन पाटलांना धक्का नाही, नवा उमेदवार अर्ज करू शकणार नाही

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक (Election) बिनविरोध होऊनही जिल्हा प्रशासनाने ती स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. भाजप उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेही अर्ज फेटाळल्यामुळे ही जागा बिनविरोध झाली होती. मात्र, आता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही निवडणूक स्थगित केली आहे.

काय आहे स्थगितीचे कारण?

अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणुक स्थगित करण्यात आली असली तरी, येथील बिनविरोधाची औपचारीक घोषणा केवळ पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

न्यायालयीन प्रक्रिया: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केल्यानंतर त्यांनी सोलापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेही अर्ज फेटाळला.
अंतिम निर्णय: या सर्व न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यक्रम सुधारित करणे आवश्यक ठरल्याने अनगरसह जिल्ह्यातील 6 नगरपालिकांमधील 6 प्रभाग आणि 2 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

नवा कार्यक्रम: आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

राजन पाटलांना कोणताही धक्का नाही!

अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेऊन विजयी जल्लोष करताना चॅलेंज केले होते, ज्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. स्थगितीमुळे राजन पाटलांना धक्का बसला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे:

अर्ज दाखल करता येणार नाही: ज्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत, अथवा ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत (उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालेला आहे), त्यांना सुधारित निवडणुकीत नव्याने अर्ज दाखल करता येणार नाही.

त्यामुळे बिनविरोध झालेल्या निवडीवर कोणताही परिणाम होणार नाही. नगराध्यक्ष व 18 सदस्यांना हा धक्का म्हणता येणार नाही, फक्त औपचारिकता पुढे ढकलली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवेढा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रियेला स्थगिती आदेश दिले असून, लवकरच सुधारित कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही घेतली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0