मुंबईठाणे
Trending

Dharavi Redevelopment : धारावी पुनर्विकास प्रकल्पावर ‘ठाकरे’ एकवटणार? – उद्धव ठाकरेंच्या विरोधानंतर आता राज ठाकरेही मैदानात उतरण्याची शक्यता

Uddhav And Raj on Redevelopment Dharavi Project : 7 डिसेंबरला कामराज स्कूल मैदानात सर्वपक्षीय जाहीर सभा; ‘अदानी समूहा’च्या सर्वेक्षणातील त्रुटींवर आवाज उठवणार

मुंबई :- आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असतानाच, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या लढ्यात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

7 डिसेंबर रोजी धारावीतील कामराज स्कूल मैदानात ‘धारावी बचाव समिती’ तर्फे एक सर्वपक्षीय जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राज ठाकरे सहभागी होण्याची शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

काय आहे सभेचा उद्देश?

धारावी बचाव समितीने आयोजित केलेल्या या सभेचा मुख्य उद्देश अदानी समूहाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणातील त्रुटींवर आवाज उठवणे हा आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली अनेक जुन्या आणि पात्र रहिवाशांना डावलले जात आहे, ज्यामुळे त्यांचे हक्काचे घर गमावण्याची भीती निर्माण झाली आहे, असा आरोप समितीकडून करण्यात येत आहे. या अन्यायाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांना एका व्यासपीठावर आणून धारावीच्या स्थानिकांचे म्हणणे थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, या प्रकल्पात पारदर्शकता आणावी, अशी मागणी केली जात आहे.

‘ठाकरे’ बंधू एकत्र येणार?

धारावी बचाव समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी या सभेत सहभागी होणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे.समिती लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेणार आहे.राज ठाकरे यांनी यापूर्वीही अदानी समूहावर टीका केलेली आहे. त्यामुळे जर राज ठाकरे यांनी या सभेला पाठिंबा दिला, तर धारावी प्रकल्पाविरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे सरकार आणि अदानी समूहापुढे मोठे राजकीय आव्हान निर्माण होण्याची शक्यता असून, धारावीचा मुद्दा मुंबईतील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0