क्राईम न्यूज
Trending

Borivali Robbery News : बोरीवलीत शटर तोडून चोरी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद! – ‘कस्तुरबा मार्ग’ पोलिसांची मोठी कारवाई

Borivali Latest Robbery News : सराईत आरोपी ‘रामू’ आणि साथीदाराला भाईंदरमधून अटक; तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे उकल

मुंबई :- कस्तुरबा मार्ग पोलीस Borivali Kasturba Police Station ठाण्याच्या हद्दीत दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात कस्तुरबा मार्ग पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या गुन्ह्यातील चोरीला गेलेली मालमत्ता आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा पोलिसांनी हस्तगत केली आहे. Borivali Latest Robbery News

गुन्हा आणि तपास

दिनांक 15 आणि 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारीच्या दरम्यान फिर्यादींच्या बोअरवेल साहित्याच्या दुकानाच्या शटरचे ताळे तोडून कोणीतरी अज्ञात इसमांनी दुकानातील पॉलीकॅब कंपनीची 75 हजार रुपये किंमतीची तांब्याची केबल चोरी केली होती. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. Borivali Police Latest Crime News

गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक तपास आणि परिसरातील शासकीय व खाजगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. रात्रीच्या सुमारास रिक्षाने येऊन दोन इसमांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासातून हा गुन्हा घरफोडीतील सराईत आरोपी सनोजकुमार चंदूप्रसाद हरिजन उर्फ रामू आणि त्याचा साथीदार सोनू दुबे यांनी केल्याचे सिद्ध झाले.

आरोपींना अटक आणि मुद्देमाल जप्त
पोलिसांनी यानुसार आरोपीतांच्या राहत्या परिसर (आझाद नगर झोपडपट्टी, गोल्डन नेस्ट सिग्नलजवळ, भाईंदर पूर्व, ठाणे) येथे सापळा रचून त्यांना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली तांब्याची केबल तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा क्र. (एमएच 47 सी 2473) ही हस्तगत करण्यात आली आहे.

अटक आरोपी सनोजकुमार चंदूप्रसाद हरिजन उर्फ रामू (वय 27 ) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही नवघर आणि मीरा रोड पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त परिमंडळ-12 महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कामगिरी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0