ठाणेमुंबई
Trending

Badlapur News : महाराष्ट्राच्या घराणेशाहीचा ‘कळस’!

Mumbai Badlapur BMC Election : बदलापूर नगरपरिषदेत शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी; सामान्य कार्यकर्त्याचे स्थान फक्त सतरंज्या उचलण्यापुरतेच?

बदलापूर :- महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वापार चालत आलेल्या घराणेशाहीच्या परंपरेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे. राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये सर्वच पक्षांकडून घरातील सदस्यांना उमेदवारी दिली जात असताना, कुळगांव बदलापूर नगरपरिषदेत मात्र याचा ‘कळस’ गाठला गेला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून (शिंदे गट) एकाच घरातील तब्बल सहा जणांना उमेदवारी देण्यात आल्याने, सामान्य कार्यकर्त्यांचे स्थान आता केवळ सतरंज्या उचलण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

म्हात्रे कुटुंबाला सहा तिकिटे
शिंदे गटाचे बदलापूर शहर शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा सदस्यांना तिकीट देण्यात आले आहे. वामन म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भावजई आणि पुतण्या अशा एकूण सहा जणांना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे.

उमेदवारी मिळालेले सदस्य

1.वामन म्हात्रे (स्वयं उमेदवार)

2.पत्नी

3.भाऊ तुकाराम म्हात्रे

4.भावजय उषा म्हात्रे

5.मुलगा वरुण म्हात्रे

6.पुतण्या भावेश म्हात्रे

यापूर्वी 2015 मध्येही वामन म्हात्रे यांच्या परिवारातील चार जणांना महापालिकेची उमेदवारी देण्यात आली होती.

भाजपचे टीकास्त्र

शिवसेनेच्या या तिकीट वाटपानंतर बदलापूरमधील भाजप नेत्यांनी या सगळ्या प्रकारावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. एकाच कुटुंबात इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी मिळाल्याने स्थानिक राजकारणात तीव्र नाराजी पसरली आहे.

या घराणेशाहीच्या आरोपांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते काय स्पष्टीकरण देणार, याकडे केवळ बदलापूरचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0