क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai Sex Racket : नवी मुंबई हादरली! महापे येथील आलिशान लॉजमध्ये आंतरराष्ट्रीय ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश

Navi Mumbai Sex Racket News : 4500 रुपयांमध्ये चालत होता अनैतिक बाजार; लॉजचा मालक, मॅनेजरसह तिघांना अटक, दोन बांगलादेशी महिलांची सुटका

नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तांच्या आदेशानंतर अनैतिक व्यापार आणि अवैध धंद्यांविरोधात गुन्हे शाखेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) महापे एमआयडीसी येथील ‘हर्षिता इन लॉजिंग ॲण्ड बोर्डींग’ या लॉजवर छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन बांगलादेशी पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉजचा मालक, मॅनेजर आणि वेटरसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. Navi Mumbai Sex Racket Busted News

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, लॉजचा मॅनेजर ग्राहकास आपल्या मोबाईलमधील महिलांचे फोटो दाखवून 4,500 रुपये घेऊन वेश्याव्यवसाय करवून घेतो. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि लॉजवर छापा टाकला. या ठिकाणी वेश्यागमनासाठी ठेवलेल्या दोन बांगलादेशी महिला पोलिसांना आढळल्या.

लॉज मालक उमेश हरीलाल गुप्ता, मॅनेजर अंकितकुमार पोदार, आणि वेटर समीर मुंडा यांनी राजू आणि अब्दुल नावाच्या दोन दलालांकडून या पीडित महिलांना लॉजमध्ये ठेवले होते. मॅनेजर ग्राहकांकडून पैसे घेऊन महिला पुरवत होता. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात या पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केलेल्या तिघांना 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0