क्राईम न्यूजपुणे
Trending

पुण्यात खळबळ! — तब्बल ३२ वर्षे ‘डॉक्टर’ म्हणून सेवा करणारा बोगस पदवीधारक आरोपी जामिनावर मुक्त;ॲड. विपुल अंदे यांच्या दमदार युक्तिवादाची न्यायालयात दणक्यात दखल

महाराष्ट्र मिरर : मुबारक जीनेरी

पुणे : कासेवाडी परिसरात तब्बल ३२ वर्षे वैद्यकीय व्यवसायाचा मुखवटा धारण करून उपचार करणाऱ्या ‘तोतया डॉक्टर’ प्रकरणात आज मोठी कलाटणी पाहायला मिळाली. Pune Fake Doctor बोगस पदवी व खोटी नोंदणी दाखवून वैद्यकीय उपचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या प्रमोद राजाराम गुंडू या आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. Pune Breaking News

या संवेदनशील आणि जनहिताच्या प्रकरणात आरोपीच्या बचावासाठी दाखल झालेल्या जामीन अर्जावर ॲड. विपुल अंदे यांनी न्यायालयात अत्यंत काटेकोर, प्रगल्भ आणि तर्कसुसंगत असा युक्तिवाद सादर केला. Pune Latest News
प्रकरणातील कागदपत्रांचा सूक्ष्म अभ्यास, तपासातील विसंगती, संबंधित कायदेशीर तरतुदी आणि आरोपांच्या स्वरूपाचा अभ्यासपूर्ण संदर्भ देत त्यांनी केलेल्या सखोल मांडणीचे न्यायालयाने विशेष कौतुकपूर्वक संज्ञान घेतले.

या सुनावणीत ॲड. भक्ती अंदे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य राहत, बचाव पक्षाचा युक्तिवाद आणखी सशक्त झाला.

दोन्ही पक्षांचे मांडलेले मुद्दे मन:पूर्वक ऐकून, कायदेशीर बाबींचा सविस्तर विचार केल्यानंतर मा. न्यायाधीश अलिशा बागल यांनी निर्धारित अटींसह आरोपीला जामीन मंजूर केला.
या निर्णयामुळे ३२ वर्षे चाललेल्या कथित वैद्यकीय फसवणुकीच्या या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील तपासातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0