
Aditya Thackeray On Shinde Group : ‘चोर मचाये शोर’! फडणवीसांनीही शिंदेसेनेच्या मंत्र्यांना सुनावले; ‘तुम्ही करणार असाल, तर आम्हीही करू’
मुंबई :- राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीमधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला असून, आज शिवसेनेच्या (शिंदे गट) मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मित्रपक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याने हे मंत्री नाराज आहेत. या नाराजीवरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे.
आदित्य ठाकरेंचा जहरी टोला
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले,”असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडताएत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर!”
आदित्य ठाकरे यांनी या बहिष्काराला “महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान” असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी शेवटी ‘चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…’ असा सूचक टोला लगावत शिंदे गटावर निशाणा साधला.
भाजपचाही शिंदेसेनेला ‘खडे बोल’
मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांनी डोंबिवलीतील प्रवेशांवर नाराजी व्यक्त केली असता, फडणवीस यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावले असल्याची माहिती समोर येत आहे.
फडणवीस म्हणाले, “उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपने केले तर चालणार नाही, असे होणार नाही. इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावे.” गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले या मंत्र्यांना फडणवीसांनी हे ‘खडे बोल’ सुनावले.
याचवेळी, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही ट्विट करत, “भाजपने मिंधे गँगची गाजराची पुंगी कधीच केली होती. आता फक्त ती मोडून खायला भाजपने सुरू केली आहे, एवढंच!” अशी बोचरी टीका केली आहे.फडणवीस आणि आदित्य ठाकरे या दोघांच्याही प्रतिक्रियेनंतर शिंदे गटाकडून काय उत्तर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


