Thane Cyber Fraud : ‘माया’ नावाच्या जाळ्यात अडकला! ऑनलाईन ‘टास्क जाॅब’च्या आमिषाने ठाण्यातील तरुणाला 13 लाखांचा सायबर चुना

Thane Telegram Part Time Job Fraud News : टेलेग्रामवर ‘पार्ट-टाईम’ नोकरीचे आमिष; पैसे भरताच बँक खाती रद्द, तरुणाची राबोडी पोलीस ठाण्यात धाव
ठाणे :- इंटरनेटवर ‘पार्ट टाईम टास्क जाॅब’च्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये ठाण्यातील एका नोकरदार तरुणाला तब्बल 13 लाख 65 हजार 567 रुपयांना फसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Thane Part Time Scam केवळ दोन ते तीन तासांत 2000 कमावण्याच्या आमिषात हा तरुण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला. Thane Cyber Fraud News
शहापूर तालुक्यातील एक 38 वर्षीय तरुण गोकुळनगर येथील एका कंपनीत कामाला असून, तो टेलेग्राम ॲप वापरत असताना दोन महिन्यांपूर्वी त्याला ‘माया’ नावाच्या अकाउंटवरून एक संदेश आला. त्यात ‘पार्ट टाईम जाॅब’च्या माध्यमातून चांगला नफा मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले. तरुणाला तात्काळ पैशाची गरज असल्याने त्याने प्रतिसाद दिला. Thane Latest Crime News
सुरुवातीला टास्क पूर्ण केल्यावर त्याला नफा मिळत असल्याचे भासवले गेले. मात्र, पुढे टास्क पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःची रक्कम संबंधित ॲपवर ऑनलाईन भरावी लागली. एका महिन्याच्या आत त्याने टप्प्याटप्प्याने 13 लाख 65 हजार 576 विविध बँक खात्यात पाठवले. धक्कादायक म्हणजे, पैसे पाठवल्यानंतर ती बँक खाती ॲपमधून आपोआप रद्द झाली! जेव्हा तरुणाने त्याला दर्शविण्यात आलेला नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पैसे काढता आले नाहीत आणि अधिक 50 टक्के रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने राबोडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


