मुंबई

Dombivli Crime News : डोंबिवलीच्या घरात गावठी पिस्तूल, तलवारी आणि काडतुसांचा जखीरा जप्त

स्थानिक निवडणुकांपूर्वी कल्याण गुन्हे शाखेची मोठी धडक; ‘खुनी’ रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद, 2 लाखांहून अधिक किमतीची शस्त्रे हस्तगत

डोंबिवली :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कल्याण गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने डोंबिवलीत मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. एका सराईत गुन्हेगाराने आपल्या घरात लपवून ठेवलेला तीन गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि धारदार तलवारींचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

गुन्हे शाखा युनिट-3 ला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, डोंबिवली (पूर्व) येथील गोकुळधाम टॉवरमध्ये पोलिसांनी छापा टाकून रोशन हिरानंद झा (वय 33) याला ताब्यात घेतले. हा आरोपी केवळ 33 वर्षांचा असूनही त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न (कलम 307) आणि शस्त्रे बाळगल्याप्रकरणी डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता, त्याने विक्रीसाठी आणलेली 03 गावठी पिस्तूल, 03 जिवंत काडतुसे, 02 रिकामी मॅगझिन तसेच धारदार खंजीर, चाकू आणि लोखंडी तलवार अशी एकूण 2 लाख 12 हजार 500 किंमतीची अवैध शस्त्रे मिळाली.

रोशन झा याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास सर्जराव पाटील हे करीत आहेत. ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील, बळवंत भराड आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0