क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune ATS News : पुणे हादरले! दिल्ली स्फोटानंतर ‘एटीएस’ची कोंढव्यात छापेमारी; एका व्यक्तीची कसून चौकशी

Pune ATS Latest News : दहशतवादी जुबेर हंगरगेकरशी संबंधाचा संशय; लॅपटॉप, हार्डडिस्क जप्त, फॉरेन्सिक तपासणीसाठी रवाना

पुणे :- दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ Delhi Bomb Blast झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असताना, महाराष्ट्रातील पुणे शहरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढवा भागात एटीएसने छापेमारी केली असून, एका व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे. Pune Latest Crime News

दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली आहे. एटीएसने कोंढवा भागातील एका व्यक्तीच्या घरी छापेमारी करत त्याची कसून तपासणी केली आहे. या व्यक्तीला अद्याप ताब्यात घेतलेले नाही, मात्र त्याच्या घरातून लॅपटॉप, हार्डडिस्क आणि काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले आहेत.

संशयित व्यक्तीकडून जप्त करण्यात आलेले हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आता फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर या व्यक्तीचा नेमका कोणत्या दहशतवादी संघटनेशी किंवा व्यक्तीशी संबंध आहे, हे स्पष्ट होणार आहे.

यापूर्वी, एटीएसने मुंब्रा येथील कौसा विभागातील एका शिक्षकाच्या घरीही धाड टाकली होती. तो शिक्षक ‘जमात-ए-इस्लाम’ या संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले होते. दिल्ली स्फोटानंतर ‘व्हाईट कॉलर मॉड्यूल’ संपूर्ण देशात सक्रिय करण्याची दहशतवाद्यांची तयारी होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील ही छापेमारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0