Daund Bribe News : ‘लाचखोरी’चा पर्दाफाश! सातबारा दुरुस्तीसाठी 2 लाख मागणारा दौंडचा तलाठी ‘ACB’च्या तावडीत

Pune Daund Talathi Bribe Case : केडगाव चौफुला येथे सापळा; 4 लाखांची मागणी करून महसूल कर्मचाऱ्याने स्वतःच ओढवले संकट; दौंड महसूल विभागात खळबळ
पुणे,दौंड :- एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील छोटीशी चूक दुरुस्त करण्यासाठी तब्बल 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती 2 लाख रुपये स्वीकारताना देलवडी (ता. दौंड) येथील तलाठी दीपक नवनाथ आजबे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी रंगेहाथ पकडले आहे. Daund Bribe Case या धडक कारवाईमुळे दौंड महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. Daund Latest Crime News
तक्रारदार शेतकऱ्याने 2012 साली खरेदी केलेल्या 0.06 आर जमिनीच्या क्षेत्रात संगणकीय सातबारावर 0.03 आर अशी चुकीची नोंद झाली होती. ही चूक दुरुस्त करण्यासाठी शेतकरी जुलै 2024 पासून तलाठी दीपक आजबे यांच्याकडे वारंवार अर्ज करत होते. अखेर, सप्टेंबर 2025 मध्ये तलाठी आजबे यांनी दुरुस्तीचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यासाठी थेट 4 लाख रुपयांची मागणी केली.
या मागणीनंतर त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने केलेल्या पडताळणीत तलाठी आजबे यांनी 2.5 लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 2 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केडगाव चौफुला येथे सापळा रचला आणि तलाठी दीपक आजबे याला तक्रारदार यांच्याकडून 2 लाख रुपयांची लाच घेताना जागीच अटक केली.
आरोपी तलाठी आजबे याच्यावर यवत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.



