क्राईम न्यूजदेश-विदेश
Trending

Delhi Blast News : दिल्ली स्फोटात मृतांचा आकडा 9 वर! कार बॉम्बच्या हल्ल्यात 22 हून अधिक जखमी

Delhi Car Blast News : ह्युंदाई I 20 कारमध्ये भीषण स्फोट; पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींकडून हळहळ व्यक्त; मृता-जखमींची यादी समोर

ANI :- राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी (काल) संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटात मृतांचा आकडा वाढला आहे. ताज्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

स्फोटाचा तपशील: सोमवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट ह्युंदाई I 20 कारमध्ये झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तातडीने मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना जवळच्या जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांची आणि जखमींची यादी (अपूर्ण): या घटनेतील काही मृत आणि जखमींची नावे समोर आली आहेत.

मृत (9 जण): अशोक कुमार आणि 7 अज्ञात व्यक्ती. (एएनआयने 9 जणांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.)

जखमी (22 हून अधिक): शायना परवीन, हर्षुल सेठी, शिवा जायसवाल, समीर, जोगिंदर, भवानी शंकर सहरमा, गीता, विनय पाठक, पप्पू, विनोद सिंह, शिवम झा, मोहम्मद शहनवाज, अंकुश शर्मा, मोहम्मद फारुख, तिलकराज, मोहम्मद सफवान, मोहम्मद दाऊद, किशोरीलाल, आझाद आणि ४ अज्ञात व्यक्ती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.“आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनीही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली

“दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची बातमी खूपच दुःखद आणि चिंताजनक आहे. या दुःखद अपघातात अनेक निष्पाप जीव गमावल्याने दुःख झालं आहे. या दुःखद काळात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबांबरोबर मी आहे आणि माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो,” असे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0