Virar Police News : अर्नाळा पोलिसांकडून जनजागृती, नशा मुक्तीची जनजागृती, पोलिसांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमात होळीचे दहन
अर्नाळा पोलीस ठाणे यांचेकडुन नशा मुक्तीकरीता अनोख्या होळीचे दहन करून समाजात जनजागृती केले
विरार :- 24 मार्चला राज्यात मोठ्या प्रमाणावर होळी सण साजरा केला जात होता. 25 मार्च धुलीवंदन हा सण सर्वत्र साजरा करण्यात आला आहे. परंतु समाजात मोठ्या प्रमाणात शालेय मुले व तरूण पिढी हे व्यासनाचे आहरी जात असल्याने समाजामध्ये जनजागृती होवुन शालेय मुले व तरूण पिढी नशेपासुन मुक्त व्हावे याकरीता मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त,श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय यांचे सुचनेप्रमाणे जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 विरार, विजय लगारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, विजय पाटील, यांचे संकल्पनेतुन आज (26 मार्च 2024) रोजी सकाळी 11 वाजता अर्नाळा पोलीस ठाणे येथे नशामुक्ती जनजागृतीच्या अनुषंगाने नशामुक्तीचे प्रतिकात्मक फलक लावुन होळी साजरी करून समाजातील शालेय विद्यार्थी व तरूण पिढीला नशे पासुन मुक्त राहणे बाबत संदेश देण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांकरीता पोलीस ठाणे हद्दीतील प्रतिष्ठीत नागरीक, शालेय मुले व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार उपस्थित होते.