क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Murder News : ‘मर्डर मिस्ट्री’चा थरार संपला! 7 वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपी मुंबईत सापडला

Mumbai Payduni Police Latest News : पायधुनी पोलिसांची मध्य प्रदेश पोलिसांना गुप्त मदत; मस्जिद बंदर येथून राजाराम तिवारीला अटक करून जुना गुन्हा मार्गी

मुंबई :- मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याच्या Mumbai Paydhuni Police Station गुन्हे प्रकटीकरण पथकाने एखाद्या ‘क्राईम थ्रिलर’ला शोभेल अशी कामगिरी करत, तब्बल सात वर्षांपासून मध्य प्रदेशातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला शोधून काढले आहे. न्याय आणि कायद्यापासून इतकी वर्षे दूर पळणाऱ्या या आरोपीला अखेर मुंबईच्या गजबजलेल्या मस्जिद बंदर परिसरातून अटक करण्यात आली. Mumbai Latest Crime News

दिनांक 06 नोव्हेंबर 2025 रोजी मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील बरही पोलीस ठाण्याचे पथक मुंबईत दाखल झाले. बरही पोलीस ठाणे येथे खुनासह (कलम 302) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल असलेला आरोपी राजाराम रामाधार तिवारी (वय 35) हा गेल्या सात वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे मदतीची मागणी केली. Mumbai Police Latest Crime News

पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2, मुंबई Mumbai Police Unit 2 यांच्या मार्गदर्शनाखाली पायधुनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तातडीने सूत्रे हलवली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे राजाराम तिवारीचा कसून शोध घेतला. अखेर, अथक प्रयत्नांनंतर हा फरारी आरोपी बाळगी हॉटेलजवळील फुटपाथ, पी. डीमेलो रोड, मस्जिद बंदर पूर्व इथे पोलिसांना सापडला.

ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याचा खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पायधुनी पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी मध्य प्रदेशातील बरही पोलीस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात सुपूर्द केले आहे. सात वर्षांनंतर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक झाल्यामुळे या जुन्या ‘मर्डर मिस्ट्री’चा थरार आता संपुष्टात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0