Navghar Police News : भाईंदरमध्ये ‘एमडी’ तस्करांचा पर्दाफाश! नवघर पोलिसांकडून 3.54 लाखांचे गांजा आणि मॅफेड्रॉन जप्त

Navghar Police Busted Drug Racket : पोलीस कोठडीत केलेल्या चौकशीतून मुख्य आरोपीच्या घरातून महागडा ‘मॅफेड्रॉन’ अंमली पदार्थ हस्तगत; तीन आरोपींना बेड्या
भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या नवघर पोलीस ठाण्याच्या Navghar Police Staion पथकाने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. या कारवाईत गांजा (कॅनबीज) सह सुमारे 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा महागडा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. Bhayandar Police Latest News
पोलिसांची मोठी कारवाई
4 नोव्हेंबर 2025 रोजी भाईंदर पूर्व येथील बी.पी. रोड परिसरात छापा टाकून पोलिसांनी गुलजार मुबारक खान, गौरव संभाजी सुर्यवंशी आणि सशिद रहमदउल्ला अन्सारी या तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगलेला 1 किलो 640 ग्रॅम वजनाचा गांजा (किंमत 24 हजार 600 ) जप्त करण्यात आला होता. या तिघांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, आरोपींना पोलीस कोठडीत घेतल्यानंतर केलेल्या कसून चौकशीतून आणखी मोठा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपी क्रमांक 1 गुलजार मुबारक खान याच्या राहत्या घरावर छापा टाकून 66 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ हस्तगत केला. जप्त केलेल्या एमडीची किंमत सुमारे 3 लाख 30 हजार इतकी आहे. अशा प्रकारे या संपूर्ण कारवाईत 3 लाख 54 हजार 600 रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. Bhayandar Latest Crime News
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी हे करीत आहेत.


