मुंबईठाणे
Trending

Prakash Surve : ‘आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे’: आमदार प्रकाश सुर्वे यांचे वादग्रस्त विधान

Prakash Surve Latest News : मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून वाद पेटला; मनसे, उद्धव सेनेकडून टीकेची झोड उठल्यानंतर सुर्वे यांनी मागितली माफी

मुंबई :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच पुन्हा एकदा भाषिक मुद्दा ऐरणीवर आला आहे. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे Prakash Surve यांनी एका जाहीर कार्यक्रमात मराठी आणि हिंदी भाषेच्या संबंधात अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेबद्दल आणि उत्तर भारतीयांबद्दल बोलताना म्हटले की, “मराठी ही माझी आई आहे, तर उत्तर भारत ही माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे.” या वक्तव्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेकडून त्यांच्यावर लगेच टीकास्त्र सोडण्यात आले. विरोधकांनी मतांच्या लाचारीसाठी सुर्वे यांनी असे वक्तव्य केल्याचा आरोप केला.

उद्धव सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुर्वे यांच्यावर थेट निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “2022 रोजी आईलाच नमस्कार करून ते बाहेर पडले. त्यांना आई आणि माता याच्यातील फरक तरी कळतो का? मतांच्या लाचारासाठी त्यांनी असं विधान केले आहे.”

उद्धव सेना आणि मनसे नेत्यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर अखेर आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, “मराठी माझी मायमाऊली आहे.” “अनावधनाने माझ्याकडून तो शब्द बाहेर पडला,” असे म्हणत त्यांनी सारवासारव केली. “कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो,” असे म्हणत सुर्वे यांनी हात जोडून माफी मागितली.

या वादावर प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत यांनी आमदार सुर्वे यांचा बचाव केला. ते म्हणाले, “आमदार सुर्वे यांच्याकडून चुकून हा शब्द बाहेर पडला. त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.” परंतु काही जण त्यांच्या वक्तव्याचा आधार घेत राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला. मराठी भाषेसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार काम करत असल्याचे सामंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0