क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Eknath Khadse Home Robbery Case : एकनाथ खडसेंच्या बंगल्यातील चोरीचा उलगडा; उल्हासनगरमधील तिघांना अटक, सराईत गुन्हेगार सामील

Eknath Khadse Home Robbery Case Update : रेकी करून चोरी केल्याचे उघड; सीडी-कागदपत्रे चोरीचा तपास सुरूच; जप्त केलेले सोने-चांदीचे दागिने हस्तगत

जळगाव :- राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई बंगल्यात झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. या घटनेत जळगाव पोलिसांनी Jalgaon Police उल्हासनगर (Ulhasnagar) येथील तीन आरोपींना अटक केली असून, या टोळीतील तीन जण अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. Maharashtra Crime News Update

अटकेत असलेल्या आरोपींपैकी एक आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध राज्यांमध्ये सत्तावीस गुन्हे दाखल आहेत. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चोरी करण्यापूर्वी खडसे यांच्या घराची काही दिवस रेकी केली होती. पोलिसांनी चोरी झालेले सोने आणि चांदीचे दागिने देखील जप्त करण्यात यश मिळवले आहे.

चोरीनंतर एकनाथ खडसे यांनी घरातून दागिने, तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे आणि सीडी चोरीस गेल्याचा आरोप केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडसे यांनी पोलिसात केवळ दागिने चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती, त्यानुसार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सीडी अथवा कागदपत्रे चोरी बाबत अद्याप पोलीस तपासात समोर आलेले नाही, त्याबाबत तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासह मुक्ताईनगर व वरणगाव परिसरातील तीन पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते. या दरोड्यांमध्ये एकूण सुमारे 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला होता. त्या घटनेनंतर जळगाव पोलिसांनी एसआयटी स्थापन करून 6 आरोपींना अटक केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0